पाकिस्तान बनला १२ परदेशी दहशतवादी संघटनांचा अड्डा; त्यापैकी पाच भारतविरोधी कारवायात गुंतले


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये १२ परदेशी दहशतवादी संघटना आहेत. त्यापैकी पाच भारतविरोधी कारवायात गुंतल्या आहेत. या दहशतवादी गटांचे जागतिक पातळीवर, अफगाणिस्तान, भारत आणि काश्मीर-केंद्रित, देशांतर्गत आणि पंथीय (शियाविरोधी) म्हणून वर्गीकरण केले गेले आहे, अशी माहिती द्विपक्षीय काँग्रेसच्या अहवालातून देण्यात आली आहे. Pakistan becomes 12 foreign extremist stronghold; Compiled in those five anti-India actions

‘पाकिस्तानमधील दहशतवादी आणि इतर अतिरेकी गट हे १९८० पासून कार्यरत आहेत. मनी लॉन्ड्रिंग आणि दहशतवादी वित्तपुरवठा सुरु ठेवल्यामुळे २०१८ मध्ये फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (FATF) पाकिस्तानला “ग्रे लिस्ट” मध्ये टाकले होते. पाकिस्तानने दहशतवाद रोखण्यासाठी राबविलेल्या योजनांपैकी २७ पैकी २६ पूर्ण केल्या. परंतु दहशतवाद्यांना वित्तपुरवठा नेहमी सुरु राहील, याची तजवीज केली.
गेल्या महिन्यात अफगाणिस्तान तालिबानने ताब्यात घेतला. त्यासाठी पाकिस्तानने पाठींबा दिला होता. अफगाण तालिबानला अमेरिकेने २००२ मध्ये जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले होते. अफगाणिस्तानवर अमेरिकेच्या दोन दशकांच्या कारकिर्दीत अफगाण तालिबानचे नेतृत्व मुख्यतः बलुचिस्तान प्रांतीय राजधानी क्वेटा, तसेच कराची, पेशावर येथे कार्यरत होते.

अल कायदा (AQ) : ११ सप्टेंबरच्या हल्ल्यानंतर अमेरिकेच्या सैन्याने अफगाणिस्तानातून दहशतवादी गटाला हद्दपार केले. त्यानंतर या गटाने मुख्यतः पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा आणि कराचीमधून काम केले आहे. २०११ पासून अल कायदाचे नेतृत्व आयमन अल-जवाहिरी करत आहे. इतर देशात संघटनेच्या दहशतवाद्यांनी संबंध ठेवल्याची माहिती आहे.

अल कायदा इन द इंडियन सबकॉन्टिनेंट (एक्यूआयएस) : काँग्रेसच्या अहवालानुसार, एक्यूआयएस अंदाजे शंभर दहशतवादी असून ते पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ल्यांमध्ये गुंतले आहेत.

इस्लामिक स्टेट-खोरासन प्रांत (ISKP किंवा IS-K)-इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया (ISIS, ISIL किंवा Da’esh) यांचे सुमारे १५०० ते २२०० दहशतवादी असावेत, असा अंदाज आहे. बहुतेक जण तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) चे माजी सदस्य आहेत. काबूल विमानतळाबाहेर झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटासाठी इसिस-के जबाबदार होते ज्यात डझनभर लोकांचा बळी गेला.

हक्कानी नेटवर्क – १९८०च्या दशकाच्या उत्तरार्धात स्थापना. २०१२ मध्ये विदेशी दहशतवादी संघटना घोषित झाली. या गटाचा संस्थापक जलालुद्दीन हक्कानीचा मुलगा सिराजुद्दीन हा आता अफगाणिस्तानचा गृहमंत्री झाला आहे. शंभर म्होरके आणि अंदाजे ३ ते ५ हजार सशस्त्र अतिरेक्यांसह, हक्कानी नेटवर्कचे पाकिस्तानच्या मुख्य गुप्तचर संघटना आयएसआयशी संबंध आहेत.लष्कर-ए-तैयबा (एलईटी)-पाकिस्तानमध्ये १९८० च्या उत्तरार्धात स्थापन झालेला, दहशतवादी गट मुंबईतील २६ /११च्या हल्ल्यांसह विविध हाय-प्रोफाइल हल्ल्यांसाठी जबाबदार आहे. लष्कर-ए-तय्यबाला २००१ पासून पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात आणि पाकव्याप्त काश्मीर या ठिकाणी आहे.

जैश-ए-मोहम्मद-दहशतवादी संघटनेची स्थापना २००० मध्ये मसूद अझहरने केली होती आणि २००१ मध्ये कार्यरत झाली. एलईटी बरोबरच जेईएम भारतीय संसदेवरील हल्ल्याला जबाबदार होता. पाकिस्तानच्या पंजाब आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये जेईएमचे अनेक दहशतवादी भारत, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये असून काश्मीरचे पाकिस्तानमध्ये विलीनीकरण करताना कार्यरत आहेत. जेईएमने खुलेपणाने युनायटेड स्टेट्सविरुद्ध युद्ध जाहीर केले आहे

हिज्बुल मुजाहिद्दीन – १९८९मध्ये स्थापन झालेल्या, पाकिस्तानच्या सर्वात मोठ्या इस्लामवादी राजकीय पक्षाच्या दहशतवादी संघटनेला २०१७ मध्ये आघाडीची संघटना म्हणून नियुक्त केले. ते काश्मीरमध्ये कार्यरत असलेल्या सर्वात मोठ्या आणि सर्वात जुन्या दहशतवादी गटांपैकी एक आहे. काश्मीरस्थित असले तरी हिज्बुल मुजाहिद्दीनचा पाकिस्तान मुख्य निधी स्रोत आहेत.

तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी)-पाकिस्तानने २००७ मध्ये स्थापन झालेल्या दहशतवादी संघटनेवर बंदी घातली आहे. मुख्यतः वंशीय पश्तून अतिरेक्यांची संघटना आहे. २०१४ मध्ये पाकिस्तानी लष्करीने कारवाई केली. त्यामुळे त्यांनी पूर्व अफगाणिस्तानच्या सीमा भागात पलायन केले होते. अल कायदाशी संबंध असून ती पाकिस्तान सरकारला पराभूत करण्यासाठी डावपेच रचते. खैबर पख्तुनख्वामध्ये शरिया कायदा लागू करण्यासाठी प्रयत्न करते.

बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) – एक हजारांपर्यंत सशस्त्र अतिरेक्यांचा वांशिक -आधारित अलगाववादी गट मुख्यतः पाकिस्तानच्या वांशिक बलूच भागात कार्यरत आहे. बलुचिस्तानमध्ये वर्षानुवर्षे हिंसाचाराला कारणीभूत आहे

हरकत -उल जिहाद इस्लामी – १९८० मध्ये स्थापना. अफगाणिस्तानमध्ये सोव्हिएत सैन्याविरोधात लढा दिला आणि नंतर भारताच्या दिशेने आपले प्रयत्न पुनर्निर्देशित केले. सध्या, HUJI अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश आणि भारतात कार्यरत आहे आणि काश्मीरला पाकिस्तानमध्ये जोडण्याचा प्रयत्न करतो.

हरकत उल-मुजाहिदीन- मुख्यतः पाकव्याप्त काश्मीर आणि काही पाकिस्तानी शहरांमधून नियुक्त आणि संचालित होते. १९९९ मध्ये भारतीय विमानाचे अपहरण करण्यासाठी हे जबाबदार होते, ज्यामुळे जेईएमचा संस्थापक मौलाना मसूद अझहर हा भारतीय तुरुंगातून सुटला.

सिपाह-ए-साहाबा पाकिस्तान- हा शियाविरोधी गट पाकिस्तानच्या पंजाबमध्ये १९८० च्या मध्यात स्थापन झाला. हे प्रामुख्याने पूर्व फाटा, पंजाब, बलुचिस्तान आणि कराचीमध्ये चालते.

Pakistan becomes 12 foreign extremist stronghold; Compiled in those five anti-India actions

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण