वृत्तसंस्था
बंगलोर : हिजाब हा इस्लामचा अविभाज्य भाग नाही, तसेच शाळांमध्ये हिजाब पेक्षा युनिफॉर्म महत्त्वाचा आहे, असा निर्वाळा कर्नाटक हायकोर्टाने आज दिला आहे. यामुळे कर्नाटक तसेच संपूर्ण देशभरात हिजाब बंदीच्या मुद्द्यावर गाजत असलेल्या वादावर कर्नाटक हायकोर्टाने स्पष्टपणे निकाल देऊन शाळांमध्येही हिजाब बंदी योग्य असल्याचा निर्वाळा दिला आहे. Hijab Ban: Hijab is not an integral part of Islam, ban on hijab in schools is also appropriate; Nirvala of Karnataka High Court !!
हिजाब बंदीच्या या निकालाचे अयोग्य परिसरात कर्नाटकातून उमटू नयेत म्हणून सरकारने अनेक जिल्ह्यांमध्ये 144 कलम लागू केले आहे.
कर्नाटकातील काही विद्यार्थिनींनी हिजाब परिधान करणे हा आपला मौलिक अधिकार असल्याचा दावा करत हायकोर्टात याचिका दाखल केली होती. शाळांमध्ये हिजाब घालून यायला परवानगी आहे. पण वर्गात हिजाब घालून बसता येणार नाही, असे कर्नाटकातील काही शाळांचे म्हणणे होते. त्याचबरोबर हिजाब पेक्षा शाळेचा गणवेश महत्त्वाचा आहे, असेही शाळांचे म्हणणे आहे.
#BREAKING Wearing of Hijab is not essential religious practice of Islamic Faith : Karnataka High Court. HC Dismisses writ petitions filed by Muslims girl students seeking permission to wear #Hijab in colleges. Court holds prescription of uniform as a reasonable restriction. https://t.co/ZcAoEv9kv3 — Live Law (@LiveLawIndia) March 15, 2022
#BREAKING Wearing of Hijab is not essential religious practice of Islamic Faith : Karnataka High Court.
HC Dismisses writ petitions filed by Muslims girl students seeking permission to wear #Hijab in colleges. Court holds prescription of uniform as a reasonable restriction. https://t.co/ZcAoEv9kv3
— Live Law (@LiveLawIndia) March 15, 2022
कर्नाटक हायकोर्टाने शाळांचे म्हणणे उचलून धरले असून हिजाब हा इस्लामचा अविभाज्य भाग नाही, असे स्पष्ट केले आहे. तसेच शाळांमध्ये शिस्तीच्या दृष्टीने गणवेश अधिक महत्त्वाचा आहे, असा निर्वाळा ही हायकोर्टाने दिला आहे. या निर्णयाचे स्वागत भाजपचे वरिष्ठ नेत्याने संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केले आहे तसेच विविध संस्था आणि संघटनांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App