HC Rejected Nawab Mailk Petition : नवाब मलिकांची ईडी अटक कायदेशीरच; मालिकांची याचिका हायकोर्टाने फेटाळली!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर यांच्याशी जमीन व्यवहारात मनी लॉन्ड्रिंग करणारे राष्ट्रवादीचे मंत्री आणि प्रवक्ते नवाब मलिक यांना दिलासा देण्यास मुंबई हायकोर्टाने नकार दिला आहे. नवाब मलिक यांची सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने केलेली अटक कायदेशीर असल्याचा निर्वाळा हायकोर्टाने दिला असून नवाब मलिक यांची ईडी कारवाई विरोधातील याचिका फेटाळून लावली आहे. HC Rejected Nawab Mailk Petitionईडीच्या अधिकाऱ्यांनी आपल्याला केलेली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा नवाब मलिक यांनी करत मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. आपल्या विरुद्धचे ईडीने लावलेले आरोप बनावट असल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यामुळे हे सर्व आरोप फेटाळून लावावे, असा युक्तिवाद नवाब मलिक यांच्या वकिलांनी केला होता. मात्र या सर्व बाबी मुंबई हायकोर्टाने स्पष्टपणे फेटाळून लावल्या असून नवाब मलिक यांना दिलासा देण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे.

– ईडीची कारवाई कायद्यानुसारच

ईडीच्या कारवाई विरोधात केलेली याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे. अटक बेकायदेशीर असल्याचा नवाब मलिकांचा दावा चुकीचा असल्याची टिप्पणी हायकोर्टाने केली आहे. ईडीने केलेली कारवाई कायद्याला अनुसरूनच असल्याचे हायकोर्टाने म्हटले आहे. नवाब मलिकांसमोर रितसर जामीनासाठी अर्ज करण्याचा पर्याय उपलब्ध असल्याचे हायकोर्टाने म्हटले आहे.

HC Rejected Nawab Mailk Petition

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था