PM Modi On Dynasty : हो हो.. तुमच्या मुलाबाळांची तिकिटे मीच कापली आहेत! घराणेशाही चालणार नसल्याचा मोदींचा खासदारांना कडक संदेश..


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भाजपची पुढची लढाई राजकीय लढाई ही प्रादेशिक पक्षांच्या घराणेशाहीची असल्याचे सूतोवाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधीच केल्यानंतर आज त्याहीपुढे जाऊन त्यांनी भाजप मधल्या घराणेशाही चालवणाऱ्या नेत्यांना कडक शब्दात संदेश दिला. इथून पुढे कोणाचे तिकीट कापले गेले तर माझी जिम्मेदारी पण भाजपमध्ये घराणेशाही चालणार नाही, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भाजप संसदीय दलाच्या बैठकीत काढले आहेत. PM Modi On Dynasty: If ticket is cut, I am responsible, but dynastic rule will not work in BJP; Prime Minister Modi’s strong message to MPs !!

– 2024 ची रूपरेखा

भाजपच्या लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. यावेळी 2024 च्या लोकसभा निवडणुकीची जणू रूपरेखा त्यांनी आपल्या भाषणातून सर्व खासदारांना पुढे मांडली. भाजपने नेहमीच काँग्रेसच्या घराणेशाही विरुद्ध लढा दिला आहे, पण काँग्रेसच्या घराणेशाही एवढीच प्रादेशिक पक्षांची घराणेशाही देखील लोकशाहीला घातक ठरली आहे.



या प्रादेशिक पक्षांच्या घराणेशाही विरुद्ध लढा द्यायचा असेल तर आपल्याला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. आपल्या पक्षात देखील घराणेशाही इथून पुढे चालणार नाही. कोणाचे तिकीट कापले गेले तर जिम्मेदारी माझी पण घराणेशाही खपवून घेतली जाणार नाही असा कडक संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदीय दलाच्या भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत दिला आहे.

– तरुणांशी संपर्कावर भर

पंतप्रधानांनी आपल्या संपूर्ण भाषणात ज्या पद्धतीने खासदारांना संबोधित केले त्यातून खासदारांनी आपापल्या मतदार संघाच्या जिम्मेदारी बरोबरच राष्ट्रीय पातळीवर जिम्मेदारी देखील जबाबदारीने निभावली पाहिजे यावर भर दिला. नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून तरुणांपर्यंत अधिकाधिक पोचण्याचा संदेश पंतप्रधानांनी यावेळी दिला. त्याचबरोबर पंतप्रधानांचा खऱ्याअर्थाने रोख प्रादेशिक पक्षांच्या घराणेशाहीवर राहिल्याने पुढच्या सर्व निवडणुकांमध्ये अर्थातच विशेषतः दक्षिणेकडील तेलंगण, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र तामिळनाडू आदी राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपने अधिक लक्ष केंद्रित केल्याचे स्पष्ट होत आहे.

PM Modi On Dynasty : If ticket is cut, I am responsible, but dynastic rule will not work in BJP; Prime Minister Modi’s strong message to MPs !!

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात