विशेष प्रतिनिधी
भोपाळ – मध्यप्रदेशला मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. मागील चोवीस तासांपासून संततधार पाऊस कोसळत असल्याने ग्वाल्हेर- चंबळ खोऱ्यातील १ हजार १७१ गावांना पुराचा वेढा पडला आहे. heavy rain in MP
शिवपुरी, शेवोपूर, ग्वाल्हेर आणि दतिया जिल्ह्यांत मदत आणि बचाव कार्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. शिवपुरी जिल्ह्यात आज सकाळी पिपरौधा खेड्यात पूरग्रस्त भागांत अडकून पडलेल्या पाच नागरिकांची सुटका करण्यात आली.
शिवपुरी, शेवोपूर, भिंड आणि दतियात पूरस्थिती गंभीर बनली आहे. या पुराचा मोठा फटका रेल्वे वाहतुकीलाही बसला असून ग्वाल्हेर- इंदूर इंटरसिटी एक्स्प्रेस शिवपुरी आणि गुनादरम्यान असलेल्या पाडरखेडा रेल्वेस्थानकावर अडकून पडली आहे.
पुराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दूरध्वनीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधताना राज्यातील स्थिती त्यांच्या कानी घातली. यावेळी पंतप्रधानांनीही त्यांना सर्वोतपरी मदत करण्याचे आश्वायसन दिले आहे. पूरग्रस्त भागांमध्ये राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या दीड हजारांपेक्षाही अधिक तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App