मध्यप्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडून तीन दत्तक मुलींचे ‘कन्यादान’ ; विदिशामध्ये विवाह सोहळा थाटात

वृत्तसंस्था

विदिशा : मध्यप्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दत्तक घेतलेल्या तीन मुलींचा विवाह थाटात केला असून चौहान दांपत्यानी त्यांचे कन्यादानही केले. विदिशा येथील एका मंदिरात या तीन मुलींचा विवाह झाला. त्यावेळी पारंपरिक पद्धतीने त्यांचे लग्न झाले. तेव्हा चौहान दांपत्यानी त्यांचे कन्यादान केले. Madhya Pradesh Chief Minister Shivraj Singh Chouhan’s ‘Kanyadan’ of three adopted girls

संसद सदस्य असताना त्यांनी या तीन मुलींना दत्तक घेतले होते. आता या मुलींचा विवाह झाल्यामुळे एका मोठ्या जाबादरीतून मुक्त झाल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. खासदार असताना या मुलींना मी दत्तक घेतले होते. आता विवाह झाल्यामुळे अतिशय आनंदी असल्याचे ते म्हणाले.

राधा, प्रीती आणि सुधा अशी मुलींची नावे आहेत. त्यांचा विवाह झाल्यामुळे मला खूपच आनंद झाला, असे ट्विट त्यांनी केली. मुली आनंदाने नांदाव्यात आणि त्यांचे भावी आयुष्य आनंदात जावे, अशी भावना वडील या नात्याने मी करतो, असे ते म्हणाले. विशेष म्हणजे मुलींची आठवण कायम रहावी, या हेतूने त्यांनी मुलींच्या नावाने तीन झाडांची रोपेही लावली आहेत. झाडे मोठी होतील तेव्हा या झाडांच्या सावलीत बसून मुलींच्या आठवणींना उजाळा देता येईल. मुलींबरोबर कधी कधी चहापानाचा आनंद ही मला लुटता येईल,असे चौहान यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे.

वृत्तसंस्थेशी बोलताना चौहान म्हणाले, एक ते अर्धा आणि तीन वर्षांच्या असताना या मुलींना मी दत्तक घेतले होते. त्यांचे पालन पोषण करणारे कोणीही नव्हते. त्यामुळे मी त्यांची सर्व जबाबदारी घेतली होती. पत्नी साधनाने त्यांची अतिशय चांगल्या पद्धतीने आणि प्रेमाने वाढविले, काळजी घेतली. आता या मुलींचा विवाह झाल्याने मी अतिशय आनंदी आहे.

Madhya Pradesh Chief Minister Shivraj Singh Chouhan’s ‘Kanyadan’ of three adopted girls

महत्त्वाच्या बातम्या