साईना नेहवालने योगींचे अभिनंदन केले म्हणून अजित सिंहांचे चिरंजीव चिडले


वृत्तसंस्था

लखनौ – उत्तर प्रदेशात जिल्हा पंचायत निवडणूकीत भाजपचा अभूतपूर्व विजय झाला म्हणून आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू साईना नेहवालने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे अभिनंदन केले… ही अगदी सर्वसामान्य बाब झाली.

पण नेमक्या याच गोष्टीमुळे राष्ट्रीय लोकदलाचे दिवंगत अध्यक्ष चौधरी अजित सिंग यांचे चिरंजीव जयंत सिंग चौधरी हे चिडले आणि साईना सरकारी शटलर म्हणाले. जयंत सिंग हे सध्या अजित सिंगांच्या राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष आहेत. त्यांची अद्याप राष्ट्रीय पातळीवर स्वतंत्र ओळख नाही. ते माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांचे नातू आणि चौधरी अजित सिंग यांचे पुत्र आहेत. ही त्यांची राजकीय क्षेत्रात ओळख आहे.

साईना नेहवालने योगी आदित्यनाथ यांचे भाजपच्या जिल्हा पंचायत निवडणूकीतील यशाबद्दल अभिनंदन करणारे दोन ओळींचे ट्विट केले.

एवढेच तिने ट्विटमध्ये म्हटले होते. यात कोठेही योगींची अकारण भलामण नाही की कोणतेही राजकीय भाष्य देखील नाही. किंबहुना साईनाने या ट्विटमध्ये भाजपचे नाव देखील घेतलेले नाही.

तरीही अजित सिंहांचे चिरंजीव जयंत सिंह चौधरी हे चिडले आणि तिला सरकारी शटलर म्हणून मोकळे झाले. सरकारी शटरलने भाजपच्या लोकमताला डावलण्याच्या कौशल्याचे कौतूक केले आहे. मतदारांनी त्यांच्या निर्णयात असा हस्तक्षेप करणाऱ्या सेलिब्रिटींवर ड्रॉप शॉट खेळला पाहिजे, असे ट्विट जयंत सिंग चौधरी यांनी केले आहे.

Hearty congratulations for thumping victory in Zila Panchayat Chairperson election in UP

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण