एअर इंडिया पुन्हा टाटांकडे आल्यावर इंदिरा – जेआरडी यांच्यातील हृदयस्पर्शि पत्रव्यवहार व्हायरल


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : एअर इंडियाची मालकी पुन्हा टाटा सन्स कडे आल्यानंतर एक हृद्य पत्रव्यवहार व्हायरल होताना दिसतो आहे. तो पत्रव्यवहार आहे, दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि टाटा समूहाचे भीष्मपितामह जेआरडी टाटा यांच्यातला…!!Heart touching correspondence between Indira and JRD goes viral after Air India returns to Tata

ही दोन्ही कणखर व्यक्तिमत्वे एकमेकांच्या प्रेमात होती. एकमेकांचा आदर करत होती. 1978 मध्ये तत्कालीन मोरारजी देसाई सरकारने जेव्हा तडकाफडकी जेआरडी टाटा यांना एअर इंडिया च्या चेअरमन पदावरून हटविण्याचा निर्णय घेतला त्यावेळी इंदिराजींनी जेआरडी टाटा यांना दिल्लीतून कोलकात्याला जाण्याच्या फ्लाईट मधून आपल्या हस्ताक्षरात पत्र लिहिले होते.हे पत्र काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश यांनी आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केले आहे. त्याच बरोबर या पत्राला जेआरडी टाटा यांनी दिलेले प्रत्युत्तर देखील त्याला जोडले आहे. दोन कणखर व्यक्तिमत्त्वातील हृदयस्पर्शि नाते या पत्रव्यवहारातून उलगडते. इंदिराजींनी जेआरडी टाटा यांना “डिअर जेह” या नावाने संबोधले आहे, तर टाटांनी इंदिराजींना “डिअर इंदिरा” या एकेरी नावाने संबोधले आहे.

जेआरडी टाटा यांनी इंडियाची स्थापना करून कंपनीला ज्या उंचीवर नेले त्याची प्रशंसा इंदिराजींनी या पत्रात मुक्तकंठाने केली आहे. एअर इंडियाशि टाटांचे नाते फक्त चेअरमनपुरते मर्यादित नव्हते, तर ती त्यांनी आपल्या घामाने कष्टाने उभी केलेली कंपनी होती.

अगदि एअर होस्टेसच्या साडी निवडीपासून ते कंपनीच्या छोट्या छोट्या गोष्टींपासून मोठ्या निर्णयात पर्यंत प्रत्येक गोष्टींमध्ये जेआरडी टाटा यांनी जिव्हाळा दाखवला होता. यातून एअर इंडिया जागतिक दर्जाच्या विमान सेवेचा सेवेच्या पंक्तीत जाऊन बसली होती, याकडे इंदिराजी यांनी आवर्जून लक्ष वेधले आहे.

या पत्राला जेआरडी टाटा यांनी दिलेले उत्तर ही तितकेच ह्रदयस्पर्शी आहे. या म्हणजे 1978 च्या काळात अवघड ठरलेल्या या वेळेत इंदिराजींनी जी आपुलकी दाखवली त्याबद्दल जेआरडी टाटा यांनी पत्रात आभार मानले आहेत. त्याच बरोबर त्यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण उल्लेख असा केला आहे,

 

की एअर इंडिया वाढविण्यात फक्त आपलाच नाही तर आपल्या बरोबर कंपनीतील कर्मचाऱ्यांचा देखील तितकाच मोलाचा सहभाग आणि वाटा राहिलेला आहे. त्यांचे कष्ट आणि घाम यांच्या मुळे एअर इंडिया ही कंपनी फळली आणि फुलली हे टाटांनी आपल्या प्पत्र उत्तरात आवर्जून नमूद केले आहे.

सुमारे साठ वर्षानंतर एअर इंडियाची मालकी यावेळी टाटा सन्स कडे पुन्हा येते आहे, त्यावेळी जयराम रमेश यांच्या सारख्या संवेदनशील नेत्याने दोन कणखर व्यक्तिमत्त्वांमधला ह्रदयस्पर्शी पत्रव्यवहार उघड करून दोन्ही व्यक्तिमत्त्वांना मानाचा मुजराच केला आहे.

Heart touching correspondence between Indira and JRD goes viral after Air India returns to Tata

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती