हरीश रावत यांचे “बंड” शमले; उत्तराखंडात काँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख काम करणार


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : “आपल्याला हात पाय बांधून पाण्याच्या प्रवाहात सोडून दिल्यानंतर पोहायला सांगितले जात आहे,” अशा शब्दात काँग्रेसवर निशाणा साधणारे वरिष्ठ नेते आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांचे पण “बंड” अखेर शमले आहे. नवी दिल्लीत काँग्रेस हायकमांडशी चर्चा केल्यानंतर रावत यांनी उत्तराखंडात काँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख म्हणून काम करण्याचे जाहीर केले आहे.Harish Rawat to be campaign chief of congress in uttara khand

हरीश रावत हे पंजाबचे प्रभारी म्हणून अधिक प्रसिद्धीला आले होते.’ त्यांच्याच प्रभारीपदाच्या काळात कॅप्टन अमरिंदरसिंग यांना मुख्यमंत्री पदावरून बाजूला करुन काँग्रेस हायकमांडने चरणजीत सिंग चन्नी यांना मुख्यमंत्री केले होते.



त्यानंतर दोन महिन्यातच स्वतः हरीश रावत हेच “बंडखोरीच्या पायऱ्यांवर” येऊन ठेपले होते. उत्तराखंडामध्ये आपल्याला हवे तसे निर्णय पक्ष घेत नाही हे पाहिल्यावर ते खासदार राहुल गांधी यांच्या रॅलीमध्ये देखील ते गैरहजर राहिले होते.

त्यानंतर परवाच त्यांनी वेगवेगळी ट्विट करून आपली नाराजी जाहीर केली होती. परंतु काँग्रेस हायकमांडने त्यांच्या नाराजीची दखल घेऊन त्यांना आणि उत्तराखंडातील काँग्रेसच्या नेत्यांना दिल्लीत चर्चेसाठी पाचारण केले होते. त्यानुसार हरीश रावत आणि बाकीचे नेते दिल्लीत आले. त्यांनी काँग्रेस हायकमांड अशी चर्चा केली.

त्यानंतर पत्रकारांशी बोलताना हरीश रावत म्हणाले, कि उत्तराखंडमध्ये काँग्रेसचा प्रचार प्रमुख या नात्याने मी काम करणार आहे. पक्ष विजयी झाल्यानंतर मुख्यमंत्री कोणाला करायचे काँग्रेस हायकमांड ठरवले. काँग्रेस हायकमांड तसा तो नेहमीच विशेष अधिकार राहिलेला आहे.

एकूण अमरिंदर सिंग किंवा अन्य नेत्यांची बंडखोरीची दखल जरी काँग्रेस हायकमांडने घेतली नसली तरी हरीश रावत यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्याच्या बंडखोरीची दखल हायकमांडला घ्यावी लागली आहे. त्यानंतर त्यांना काँग्रेसचे प्रचारप्रमुख बनवून काम करायला सांगण्यात आले आहे.

Harish Rawat to be campaign chief of congress in uttara khand

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात