हल्लीकर जातीच्या बैलाची किंमत 1 कोटी रुपये! तर बैलाचे वीर्याचा एक डोस विकला जातो 1000 रुपयांना


विशेष प्रतिनिधी

बंगलोर : कृष्णा नावाचा हल्लीकर जातीचा एक बैल आहे. त्याची किंमत तुमच्या अंदाजानुसार किती असेल? सुमारे 1 कोटी रुपयांचा हा बैल बेंगळुरू येथे आयोजित केलेल्या या वर्षीच्या कृषी मेळ्यातील आकर्षणाचा मुद्दा ठरला आहे.

Hallikar bull worth Rs 1 crore! A dose of bull semen is sold for Rs 1000

एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, बोरेगौडा या मालकाने सांगितले, ही जात ‘सर्व गुरांच्या जातींची माता’ मानली जाते. त्या व्यक्तीने असेही सांगितले की, या बैलाच्या वीर्यालाही जास्त मागणी आहे आणि एक डोस 1,000 रुपयांना विकला जातो. बेंगळुरू येथील GKVK कॅम्पसमध्ये 11 ते 14 नोव्हेंबर दरम्यान आयोजित केलेला हा मेळावा कृषी विज्ञान विद्यापीठ-बेंगळुरू द्वारे आयोजित करण्यात आला होता.


अजिंठा लेणीत सर्जा- राजा बैलगाडीचा प्रवास अठरा वर्षानंतर सुरु


यंदाच्या कृषी मेळ्यात 12000 हून अधिक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, गुरेढोरे, सागरी आणि कुक्कुटपालनासह पारंपारिक आणि संकरित पीक प्रकार, तंत्रज्ञान आणि यंत्रसामग्री असलेले एकूण 550 स्टॉल्स आहेत. पण मुख्य आकर्षणाचा भाग आहे तो म्हणजे कृष्णा बैल. त्याच्यामुळे अनेक लोक या मेळाव्यात सहभाग घेत आहेत.

या मेळ्याचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते होणार आहे. तर कृष्णा सारख्या हल्लीकर जातीच्या बैलांना ताकद आणि सहनशक्तीसाठी सर्वत्र जास्त मागणी आहे.

Hallikar bull worth Rs 1 crore! A dose of bull semen is sold for Rs 1000

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात