ज्ञानवापीत शिवलिंग : नेमकी कहाणी काय??, भव्यता किती?? कोणी स्थापले?? हिंदूंचा अभिमानास्पद इतिहास!!


काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर परिसरातील ज्ञानवापी मशिदीत सर्वेक्षणा दरम्यान विहिरीत पुरातन शिवलिंग सापडले. यावरून देशाच्या इतिहासाने खूप मोठी करवट घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. Gyanvapit Shivling: What exactly is the story ??, what is grandeur ?? Someone founded

  •  पण हे शिवलिंग नेमके आहे काय??, ते किती भव्य आहे?? त्याची स्थापना कोणी केली?? यामागची नेमकी कहाणी काय आहे??, या सगळ्या प्रश्नांबाबत बाबत देशभरात प्रचंड आणि परदेशात प्रचंड उत्सुकता आहे.
  •  अर्थात ज्ञानवापी मशिदीतल्या सर्वेक्षणाचे सर्व अधिकृत तपशील जाहीर झालेले नाहीत. ते तपशील आता उद्या कोर्टाच्या ताब्यात जातील. आणि कोर्ट त्यावर स्क्रुटीनी करून निर्णय घेईल. त्यामुळे ज्ञानवापी मशिदीत सापडलेल्या शिवलिंगाच्या संदर्भातली फक्त कहाणीच येथे सांगता येऊ शकेल. अर्थात ही कहाणी नक्कीच रोचक आणि हिंदूंना अभिमानास्पद अशी आहे!!
  •  ज्ञानवापी मशिदीत सापडलेले शिवलिंग सुमारे 12.5 फूट लांबीचे आहे. हे तेच शिवलिंग आहे, ज्याची स्थापना मुघल शासक अकबराचे अर्थमंत्री राजे तोडरमल यांनी सन 1585 मध्ये केली होती.
  •  काही प्रसार माध्यमे शिवलिंगाची स्थापना मुगल शासक अकबराने केली होती असे सांगत आहेत. प्रत्यक्षात या शिवलिंगाची स्थापना अकबराचे अर्थमंत्री राजे तोरडमल यांनी केली होती. अकबराच्या मुघल साम्राज्यात भव्य शिवलिंगाची स्थापना करण्याचे धाडस राजे तोरडमल यांनी दाखवले होते.
  •  तेव्हा बनारसचे पंडित नारायण भट्टही त्यांच्या समवेत होते. मात्र, धर्मांध औरंगजेबाने काशी विश्वनाथाचे मूळ मंदिर पाडून त्याची मशीद बनवण्याचे आदेश दिले. त्यामुळे मुघल सैनिकांनी औरंगजेबाच्या चिथावणीतून काशी विश्वनाथाचे त्यावेळचे भव्य मंदिर उध्वस्त केले. यामध्ये शिवलिंगाच्या वरच्या भागाचे नुकसान झाले होते.
  •  हे शिवलिंग मौल्यवान पाचू (पन्ना) रत्नाचे आहे. त्याचा रंग हिरवा आहे. शिवलिंगाचा पन्हाळीसकटचा आकार सुमारे 3 – 4 मीटर आहे. ते खूप आकर्षक दिसते. हे शिवलिंग श्रीकाशी विश्वनाथ मंदिरात स्थापित नंदीसमोर ज्ञानवापी भागात आहे. नंदी महाराजांसमोरील तळघरात मशिदीच्या मधोमध हे शिवलिंग आजही पुरले आहे. त्याचा व्यासही खूप मोठा आहे, असे सांगितले जाते.
  •  श्रीकाशी विश्वनाथ मंदिराचा सन १८९० मधला फोटो उपलब्ध आहे. त्यात समोरच ज्ञानवापी विहीर दिसते आहे. 30 वर्षांपूर्वी कुलूप लावले जात असतानाही शिवलिंग दिसत होते.
  •  या संदर्भात श्रीकाशी विश्वनाथ मंदिराचे माजी महंत, कुलगुरू डॉ. तिवारी यांनी महत्वाची माहिती दिली आहे. ज्ञानवापी मशिदीत ज्याला तळघर म्हटले जात आहे, (म्हणजे जेथे कोर्टाच्या आदेशानुसार सर्वेक्षण झाले) तो खरे तर मंदिर मंडपम आहे. डॉ. तिवारी यांच्याच कुटुंबातील पूर्वज पंडित नारायण भट्ट यांनी पाचूच्या शिवलिंगाची स्थापना केली होती.
  •  1990 च्या दशकात वाराणसीचे डी. एम. सौरभ चंद्र श्रीवास्तव यांनी मंडपमला कुलूप लावले होते. त्या वेळी आतमध्ये फोटोग्राफी झाली होती. ते फोटोग्राफी करण्यामध्ये सहभागी होते. त्यावेळी आत नंदीच्या अगदी समोर शिवलिंग असल्याचे दिसले होते.

-ज्ञानवापी मशिदीखाली चार कोपऱ्यात मंडपम

1868 मध्ये रेव्ह. एमए शेरिंग यांनी लिहिलेल्या “द सेक्रेड सिटी ऑफ हिंदू” या पुस्तकात ज्ञानवापी मशिदीच्या 4 कोपऱ्यांवर मंडप असल्याचे नमूद केले आहे. ज्ञान मंडपम, शृंगार मंडपम, ऐश्वर्या मंडपम आणि मुक्ती मंडपम. परदेशी लेखक अल्तेकर यांनी या चार मंडपांचा आकार 16-16 फूट सांगितला आहे. गोलंबाराची उंची 128 फूट आहे.

– हरिशंकर जैन यांची कामगिरी

हिंदू पक्षाचे वकील हरिशंकर जैन यांनी तर पहिल्यांदा आपण शिवलिंग पाहिले आणि म्हणूनच कोर्टाची पायरी चढलो, असे स्पष्ट केले. सध्या कोर्ट तिथल्या सर्व साक्षीभूत वस्तूंना “अवशेष” असे म्हणत असले तरी तेथे हिंदू मंदिराचे अवशेष आहेत, असे जैन यांनी स्पष्ट केले आहे. शिवलिंगाची आणि पन्हाळीची पूर्ण लांबी नेमकी सांगू शकणार नाही. पण ते सुमारे 3 – 4 मीटर रुंद आहे. सर्वेक्षणात शिवलिंग दिसताच कोर्टात जाऊन संबंधित सर्वेक्षित जागा सुरक्षित राखण्यासाठी अर्ज केला आणि त्यानंतर कोर्टाने तेथे सील करण्याचे आदेश दिले, असे हरिशंकर जैन यांनी स्पष्ट केले आहे.

Gyanvapit Shivling: What exactly is the story ??, what is grandeur ?? Someone founded

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात