“अपक्ष” म्हणत संभाजीराजे महाविकास आघाडीच्या गोटात, “व्हाया” राष्ट्रवादी; राजेंच्या राज्यसभा उमेदवारीला पवारांचा पाठिंबा!!


प्रतिनिधी

मुंबई : भाजपकडून राष्ट्रपती नियुक्तीची 6 वर्षे राज्यसभेची खासदारकी मिळविल्यानंतर स्टॉपगॅप अरेंजमेंट म्हणून “अपक्ष” निवडणूक लढविण्याचे जाहीर करणारे खासदार संभाजीराजे आता “व्हाया” राष्ट्रवादी महाविकास आघाडीच्या गोटात दाखल झाले आहेत. Saying Independent Sambhaji Raje is in the group of Mahavikas Aghadi

छत्रपती संभाजीराजे यांनी भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा देऊन स्वतःच्या “स्वराज्य” या नावाची संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेतला. आता संभाजीराजे यांनी अपक्ष म्हणून राज्यसभेची निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला. त्यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाठिंबा दिला आहे. शिवसेना आणि काँग्रेसही संभाजीराजे यांना पाठिंबा देण्यासाठी पुढे येईल,  विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला आहे.

संभाजीराजे यांचा मुळातला राजकीय कल राष्ट्रवादीकडेच राहिला आहे. 2009 मध्ये त्यांनी कोल्हापुरातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढविली होती. परंतु त्यात त्यांना पराभव पत्करावा लागला होता. 2014 नंतर भाजपने विशेषतः तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाजीराजे यांना राष्ट्रपती नियुक्त खासदारकीची ऑफर दिली. ती त्यांनी स्वीकारली. ते 6 वर्षे राष्ट्रपती नियुक्त खासदार राहिले. भाजपशी संलग्न राहिले.

पण 6 वर्षांची मुदत संपल्यानंतर आपल्या मूळ राजकीय कलानुसार थेट राष्ट्रवादीत जाण्यापेक्षा स्टॉप गॅप अरेंजमेंट म्हणून संभाजीराजे यांनी राज्यसभेसाठी अपक्ष उमेदवारी जाहीर केली आणि महाराष्ट्रातल्या अपक्षांना साद घालून पाहिली. त्यांना नेमका किती प्रतिसाद मिळाला हे समजण्या आधीच शरद पवारांनी संभाजीराजे यांच्या “अपक्ष” उमेदवारीला राष्ट्रवादीचा पाठिंबा जाहीर केला आहे.

शिवसेना-काँग्रेसबाबत पवारांना विश्वास 

संभाजीराजे यांनी येत्या राज्यसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून अर्ज दखल करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. याकरिता संभाजीराजे यांना अर्ज दखल करण्यासाठी १० अनुमोदक आमदारांची आणि निवडून येण्यासाठी एकूण ४२ आमदारांच्या मतांची आवश्यकता आहे. याकरिता अनुमोदन देण्यासाठी संभाजीराजे यांनी अपक्ष आमदारांना साद घातली आहे, तर या निवडणुकीत विजयी होण्यासाठी कोणत्याच पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने त्यांनी ही जागा आपल्याला अपक्ष म्हणून देण्यात यावी, अशी जाहीर मागणी केलेली आहे.

– पवार काँग्रेसला गृहीत धरत आहेत??

या पार्श्वभूमीवर शरद पवार यांना नांदेडमध्ये माध्यमांशी बोलताना संभाजीराजेंना पाठिंबा जाहीर केला. प्रत्येक पक्षाचे संख्याबळ किती आहे, यावर सगळे अवलंबून असते. महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाच्या संख्याबळाच्या जोरावर प्रत्येकी 1 – 1 खासदार हमखास निवडून येऊ शकतो. आमच्याकडे 10 किंवा 12 मते शिल्लक आहे. शिवसेनेकडे सुद्धा 4 – 5 मते आहे, त्यांचीही काही अडचण राहणार नाही. राहिला प्रश्न काँग्रेसचा तर ते सुद्धा मदत करतील, अशी स्पष्ट भूमिका शरद पवार यांनी मांडली आहे.

Saying Independent Sambhaji Raje is in the group of Mahavikas Aghadi

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात