GST COUNCIL : जीएसटी परिषदेची ४६ वी बैठक दिल्लीत ! अर्थमंत्री निर्मला सितारमण-भागवत कराड यांची उपस्थिती; महत्त्वपूर्ण विषयांवर निर्णय


अर्थमंत्री निर्मला सितारमण (Finance Minister of India) यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषदेच्या (GST Council 46th Meeting) 46 व्या बैठकीला सुरुवात झाली आहे.  GST COUNCIL : Nirmala Sitharaman chairs 46th GST Council meeting in Delhi


वृत्तसंस्था

नवी दिल्ली:केंद्रीय अर्थसंकल्प 2022 च्या आधी आज वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परिषदेची 46 वी बैठक केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राजधानी दिल्लीत होत आहे. आयोजित बैठकीला राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे अर्थमंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत. वित्त विभागातील केंद्रीय राज्यमंत्री – पंकज चौधरी आणि भागवत किशनराव कराड – हे दोघेही जीएसटी परिषदेच्या बैठकीला उपस्थित आहेत.

 

काय निर्णय होऊ शकतात?

टेक्सटाईल सेक्टरवर जीएसटी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कापड उद्योगावरील जीएसटी पाच टक्क्यांवरून 12 टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आज हा निर्णय पुन्हा एकदा वापस घेतला जाऊ शकतो. जीएसटी संदर्भातील सर्व निर्णय हे जीएसटी परिषदेकडून घेण्यात येतात.

‘या’ विषयांवर चर्चा होण्याची शक्यता

आज अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाऊ शकतात. कपडे आणि चपलांवर जीएसटी वाढवण्याचे संकेत यापूर्वीच केंद्राकडून देण्यात आले होते.
कापड उद्योगावरील जीएसटी 5 टक्क्यांवरून वाढून 12 टक्के करण्याचा विचार सुरू होता. तसेच जीएसटीच्या स्लॅब घटवण्यावर देखील चर्चा होऊ शकते.

GST COUNCIL : Nirmala Sitharaman chairs 46th GST Council meeting in Delhi

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण