सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपचे ११ जागांवर वर्चस्व, महाविकास आघाडीकडे ८ जागा, अज्ञातवासातील नितेश राणेंची पोस्ट – गाडलाच!

BJP dominance over Sindhudurg District Bank, Nitesh Rane post after the defeat of Mahavikas Aghadi

Nitesh Rane : अवघ्या राज्याचं लक्ष ज्यांनी वेधून घेतलं त्या राणे विरुद्ध महाविकास आघाडी सरकार संघर्षाची मेख सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक मंडळाच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीत आहे. दोन्ही पक्षांनी अत्यंत प्रतिष्ठेची केलेल्या या निवडणुकीत अखेर भाजपनं बाजी मारली. 19 जागांपैकी भाजपने 11 जिंकल्या, तर महाविकास आघाडीने 7 जागांवर विजय मिळवला. यामुळे राणेंनी अखेर एकट्यानेच तिन्ही पक्षांना धूळ चारल्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, अज्ञातवासात असलेल्या नितेश राणेंची पोस्टही चांगलीच व्हायरल झाली आहे. BJP dominance over Sindhudurg District Bank, Nitesh Rane post after the defeat of Mahavikas Aghadi


प्रतिनिधी

सिंधुदुर्ग : अवघ्या राज्याचं लक्ष ज्यांनी वेधून घेतलं त्या राणे विरुद्ध महाविकास आघाडी सरकार संघर्षाची मेख सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक मंडळाच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीत आहे. दोन्ही पक्षांनी अत्यंत प्रतिष्ठेची केलेल्या या निवडणुकीत अखेर भाजपनं बाजी मारली. 19 जागांपैकी भाजपने 11 जिंकल्या, तर महाविकास आघाडीने 7 जागांवर विजय मिळवला. यामुळे राणेंनी अखेर एकट्यानेच तिन्ही पक्षांना धूळ चारल्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, अज्ञातवासात असलेल्या नितेश राणेंची पोस्टही चांगलीच व्हायरल झाली आहे.

नितेश राणेंची पोस्ट

आतापर्यंत जिल्हा बँकेवर महाविकास आघाडीच्या पॅनेलची सत्ता होती. संतोष परब हल्ला प्रकरण आणि प्रचंड आरोप-प्रत्यारोपांनी ही निवडणूक गाजली. शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर आरोप झाले. त्यांचा अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायालयाने फेटाळल्यानंतर ते आता हायकोर्टात अर्ज करणार असल्याचं बोललं जातंय. त्यातच नितेश राणे हे अज्ञातवासात आहेत.981 पैकी 968 मतदारांनी केले मतदान

गुरुवारी झालेल्या निवडणुकीत एकूण 981 पैकी 968 मतदारांनी मतदान केले. याचार्च अर्थ या निवडणुकीत तब्बल 98.67 टक्के मतदान झालंय. या मतदारांमध्ये 115 महिला, तर 853 पुरुषांचा समावेश होता. कणकवली वगळता कुठेही गालबोट लागलं नाही. मतदान प्रकिया ही शांततेत पार पडली.

जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत व उपाध्यक्ष पराभूत

जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत आणि विठ्ठल देसाई या दोन्ही उमेदवारांना समान मतं पडली. यानंतर ईश्वर चिट्ठी टाकून आलेल्या निकालात सतीश सावंत पराभूत झाले. सतीश सावंत हे जिल्हा बँकेचे विद्यमान चेअरमन होते. गतवर्षी बिनविरोध आलेले सतीश सावंत पराभूत झाल्यानं महाविकास आघाडी जबर हादरा बसला आहे. सावंत पराभूत होताच भाजपकडून जारेदार घोषणाबाजी करण्यात आली. आता कसं वाटतंय गार गार वाटतंय अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

BJP dominance over Sindhudurg District Bank, Nitesh Rane post after the defeat of Mahavikas Aghadi

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण