विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : चक्क बेडकाच्या जिवंत पेशींच्या वापरातून तयार झाला एक सजीव रोबो


शास्त्रज्ञांनी चक्क बेडकाच्या जिवंत पेशींच्या वापरातून एक सजीव रोबो तयार केला आहे. काही मिलिमीटर जाडीचा हा झेनोबोट्‌स सूक्ष्म वस्तूला निश्चिीत केलेल्या जागी सहज उचलून ठेवतो.A living robot created using the living cells of a chucky frog

औषधोपचार आणि शस्त्रक्रियेच्या क्षेत्रात अशा जिवंत पेशींच्या रोबोचे अनेक उपयोग होणार आहेत. हा झेनोबोट्‌स ना धातूच्या रोबोप्रमाणे आहे, ना जिवंत प्राण्यांप्रमाणे आहे. हा एक प्रकारच्या जैविक तंत्रज्ञानाचा नवा आविष्कार आहे.

आजपर्यंत माणसाने शेतीतील उत्पादन वाढविण्यासाठी वनस्पतींमध्ये, दूध आणि मांसाचे उत्पादन वाढविण्यासाठी पशूंमध्ये जनुकीय बदल केले आहेत. परंतु पहिल्यांदाच बेडकाच्या भ्रूणातील पेशींच्या वापरातून आणि महासंगणकाच्या साह्याने सजीव रोबो तयार करण्यात आला आहे.

आफ्रिकेच्या जंगलात आढळणाऱ्या झिनॉपस लिव्हीज प्रजातीचा बेडकाच्या भ्रूणातील पेशींचा वापर रोबो तयार करण्यासाठी करण्यात आला आहे. म्हणूनच या रोबोलो या बेडकाच्या प्रजातीवरून झेनोबोट्‌स असे नाव देण्यात आले.

झेनोबोट्‌सची बांधणी करण्यासाठी महासंगणकाचा वापर करण्यात आला. त्यासाठी विशिष्ट प्रकारचे सॉफ्टवेअर कोडिंग करण्यात आले. सॉफ्टवेअरच्या साह्याने बेडकाच्या भ्रूणातील लाखो पेशींची विशिष्ट प्रकारे रचना करण्यात आली.

जेणेकरून झेनोबोट्‌स एकाच दिशेला जाईल. बेडकाची त्वचा आणि हृदयाच्या पेशींपासून संरक्षण आणि हालचाल करणारी यंत्रणा झेनोबोट्‌समध्ये विकसित करण्यात आली आहे. शंभर वेगवेगळ्या प्रकारच्या पेशीरचनांचा यासाठी अभ्यास करण्यात आला. त्यातून एक प्रभावी रचना पुढील संशोधनासाठी निश्चिपत करण्यात आली.

स्वयंचलित झेनोबोट्‌स संगणकाने ठरवून दिलेल्या सुसंगत हालचाली करत असल्याचे सिद्ध झाले. हे झेनोबोट्‌स निम्म्यातून कापले तरी ते स्वतःला पुन्हा जोडून घेतात. फक्त यांचे आयुष्य आठवड्यापेक्षा जास्त नसते.

A living robot created using the living cells of a chucky frog

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात