IIT KANPUR : PM मोदींची IIT कानपूरला सरप्राईज व्हिसीट ! पुढच्या २५ वर्षात भारताच्या विकासाची सूत्रे तरुणांनी हातात घ्यावीत


  • विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की जीवनात शॉर्टकट टाळा आणि आव्हानांना सामोरे जाण्याचा प्रयत्न करा. कार्यक्षम उपायांसह समस्या सोडवा.
  • पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि काही विनोदी गोष्टीही शेअर केल्या. दीक्षांत समारंभात ते म्हणाले की, जो आव्हानांचा सामना करतो आणि त्यावर मात करतो तोच मोठी उंची गाठतो. IIT KANPUR: PM Modi’s surprise visit to IIT Kanpur

विशेष प्रतिनिधी

कानपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेश दौऱ्यावर असताना त्यांनी आयआयटी कानपूरला भेट दिली. मोदींच्या सरप्राईज व्हिसीटमुळे कानपूर आयआयटीच्या विद्यार्थ्यांनाही आश्चर्य वाटले. मोदींच्या या भेटीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी हा व्हिडिओ ट्विट केला आहे .

पंतप्रधान नरेंद्र मोदी पदवीदान समारंभासाठी आयआयटी कानपूरमध्ये गेले होते. येथील ५४ व्या पदवीदान समारंभामध्ये सहभागी झालेल्या पंतप्रधानांनी देशाची धुरा आता तरुणांनी आपल्या खांद्यावर घ्यावी असं म्हटलं. तसेच, त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून भाषणही केलं. सरधोपट मार्ग सोडून आव्हानांचा स्वीकार करावा आणि येत्या २५ वर्षांमध्ये आपल्याला जसा देश पाहिजे आहे, त्यासाठी काम सुरू करावं असं आवाहनही भावी इंजिनिअर्संना केलं. देशघडणीच्या कार्यात आतापर्यंत आपण खूप वेळ वाया घालविला आहे, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

मोदींनी पदवीदान समारंभानंतर या सोहळ्यात उपस्थित नसलेल्या विद्यार्थ्यांची भेट घेण्यासाठी सरप्राईज व्हिसीट केली. येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधायचा असल्याने मोदींनी ही अचानक भेट दिली. यावेळी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेही त्यांच्यासमवेत होते. महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम असल्याने विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेत होते. दरम्यान, भाजपा नेत्या प्रिती गांधी यांनी मोदींच्या या भेटीचा व्हिडिओ शेअर केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, जेव्हा तुम्ही कॉलेजमधून बाहेर पडता तेव्हा यशाचा शॉर्टकट घेऊन अनेक लोक तुमच्याकडे येतील. पण जेव्हा आराम आणि आव्हान यापैकी एक निवडण्यास सांगितले, तेव्हा मी तुम्हा सर्वांना नंतरच्या गोष्टीसाठी जाण्याची शिफारस करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आयआयटीच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचे स्टार्ट-अप हब म्हणून उदयास आले आहे.

IIT KANPUR : PM Modi’s surprise visit to IIT Kanpur

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण