अतिवृष्टीमुळे चेन्नईसह तामिळनाडूतील अनेक शहरे पाण्यात; राहुल गांधींचे परदेशातून ट्विट, माझ्या भावना तमीळ जनतेबरोबर!!


वृत्तसंस्था

चेन्नई : अतिवृष्टीमुळे तामिळनाडूची राजधानी चेन्नई अनेक शहरांची अक्षरश: दैना झाली असून अनेक शहरे आजही पाण्यात उभी आहेत. Heartfelt condolences to those who’ve lost loved ones in the heavy rains.

जनजीवन पूर्ण विस्कळीत झाले असून तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन हे स्वतः चेन्नईसह अनेक शहरांचा भर पाण्यातून चालत जाऊन दौरा करत आहेत. तमिळनाडू सरकारने अनेक ठिकाणी लोकांसाठी मदत केंद्रे उभारली असून त्या ठिकाणची पाहणी मुख्यमंत्री ए मके स्टालिन हे प्रत्यक्षात तिथे जाऊन करत आहेत.

 

चेन्नईसह अनेक शहरे पाण्यात बुडल्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांनी परदेशातून आपल्या भावना तामिळ जनतेबरोबर असल्याचे ट्विट केले आहे. राहुल गांधी सध्या इटलीमध्ये असल्याचे सांगण्यात येते. पंजाब मध्ये त्यांचा 2 जानेवारी रोजी निवडणूक दौरा होता. परंतु तो रद्द करण्यात आला असून ते परदेश दौऱ्यावरून परत आल्यानंतर निवडणूक दौरा सुरू करतील, असे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी स्पष्ट केले आहे.

मात्र सध्या राहुल गांधी खासगी दौऱ्यावर परदेशात असले तरी देशातल्या घडामोडींवर त्यांचे लक्ष आहे. परदेशातूनच राहुल गांधी यांनी ट्विट करून या संकट काळात आपण तामिळनाडूतल्या जनतेबरोबर आहोत. मुसळधार पावसामुळे ज्या लोकांनी आपले जिवलग गमावले त्यांच्याविषयी मला सहानुभूती आहे, असे त्यांनी असेही राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Heartfelt condolences to those who’ve lost loved ones in the heavy rains.

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण