पुणे : पीएमआरडीएकडून खेडमधील अनधिकृत बांधकामावर करण्यात आली कारवाई


  • अनधिकृत बांधकाम धारकांकडून निष्कासन कारवाईचा खर्च वसूल केला जाणार असल्याचे पीएमआरडीएकडून सांगण्यात आले. Pune: PMRDA takes action against unauthorized construction in Khed

विशेष प्रतिनिधी

पुणे : खेड तालुक्यातील कुरुळी येथे गट क्रमांक ६७९ या ठिकाणी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाकडून सहा औद्योगिक अनधिकृत शेडच्या ३५ हजार चौरस फुटांच्या बांधकामावर कारवाई करण्यात आली.ही कारवाई करण्यासाठी तीन पोकलॅनचा वापर करण्यात आला होता.पीएमआरडीएकडून सांगण्यात आले आहे की या अनधिकृत बांधकाम धारकांकडून निष्कासन कारवाईचा खर्च वसूल केला जाणार .



पीएमआरडीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्थानिक पोलिसांच्या बंदोबस्तात ही कारवाई केली. दरम्यान पीएमआरडीए क्षेत्रात परवानगी न घेता कोणत्याही प्रकारचे बांधकाम करू नये. नागरिकांनी घर , मालमत्ता विकत घेताना संबंधित बांधकामाबाबत परवानगी घेतली आहे का? आणि परवानगी घेतली तर कशी घेतली याबाबत खातरजमा करण्याचे आवाहन केले आहे.

Pune : PMRDA takes action against unauthorized construction in Khed

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात