देशात आतापर्यंत तब्बल १७ कोटी नागरिकांचे लसीकरण, सर्व राज्यांना पुरवठा वाढला

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – केंद्र सरकारने आत्तापर्यंत सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेशांना १७ कोटी ९३ लाख ५७ हजार ८६० लशी विनामूल्य पुरविल्या आहेत. त्यापैकी १६ कोटी ८९ लाख २७ हजार ७९७ लशींचा वापर झाला आहे. अजूनही एक कोटींपेक्षा अधिक लशी शिल्लक आहेत, असा दावा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केला आहे. Govt. gave vaccine dose to 17 crore people

येत्या तीन दिवसांत सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना लशीचे नऊ लाख २४ हजार ९१० डोस पुरविले जातील, असेही मंत्रालयाने स्पष्ट केले. कोरोना साथीवर मात करण्यासाठी चाचण्या, नियमांचे पालन, रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींच्या शोधाबरोबरच लसीकरणही केंद्र सरकारच्या पंचसूत्रीतील महत्वाचा घटक असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.देशाच्या प्रत्येक भागातून आात केंद्राकडे लशींची मागणी वाढली आहे. सध्याच्या काळात कोरोनापासून बचाव करण्यासाठी लस हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे नागरिकही आता लस घेण्यास प्राधान्य देत आहेत.

Govt. gave vaccine dose to 17 crore people

महत्त्वाच्या बातम्या