Buffer Stock Of Life Saving Corona Drugs : देशातील कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता केंद्र सरकारने रेमडेसिव्हिर आणि फेव्हिपिराव्हिर यासारख्या आवश्यक कोरोना औषधांचा 30 दिवसांचा बफर स्टॉक करण्याचा निर्णय घेतला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जीवनरक्षक औषधांव्यतिरिक्त सरकार पॅरासिटामॉल, अँटीबायोटिक्स आणि व्हिटॅमिन्स यासारख्या सामान्य औषधे आणि सप्लिमेंटसचाही पुन्हा साठा करत आहे. Government Is Building A 30 Day Buffer Stock Of Life Saving Corona Drugs As The Country Braces For Imminent 3rd Wave
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशातील कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता केंद्र सरकारने रेमडेसिव्हिर आणि फेव्हिपिराव्हिर यासारख्या आवश्यक कोरोना औषधांचा 30 दिवसांचा बफर स्टॉक करण्याचा निर्णय घेतला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जीवनरक्षक औषधांव्यतिरिक्त सरकार पॅरासिटामॉल, अँटीबायोटिक्स आणि व्हिटॅमिन्स यासारख्या सामान्य औषधे आणि सप्लिमेंटसचाही पुन्हा साठा करत आहे.
माध्यमांच्या माहितीनुसार, तिसऱ्या लाटेच्या आधी रेमडेसिव्हिरच्या 50 लाख कुप्या खरेदी करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. या वेळी सरकार आगाऊ पैसे देत आहे. सरकार रेमडेसिव्हिर, फेव्हिपिराव्हिरसारख्या औषधांचा स्टॉक करत आहे, जेणेकरून दुसऱ्या लाटेसारखे हाल होऊ नयेत.
ही भीती व्यक्त करताना भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) मुख्य संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. समीरन पांडा म्हणाले की, ऑगस्टपासून देशात कोरोनाची तिसरी लाट दिसू शकते. पांडा यांनी गणितीय आकलनाच्या आधारे असे भाकीत केले आहे की, आगामी लाटेमध्ये दैनंदिन रुग्णसंख्येत जवळपास 50 टक्क्यांची वाढ होऊ शकते. ऑगस्टमध्ये येणाऱ्या लाटेदरम्यान दररोज एक लाखाहून अधिक रुग्णांची नोंद होण्याची शक्यता आहे.
तथापि, दुसर्या लाटेच्या तुलनेत ही खूपच कमी आहे, कारण मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशात दररोज चार लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाली होती. सद्य:परिस्थिती पाहिल्यास दररोज सरासरी 40 ते 45 हजार प्रकरणे नोंदविली जात आहेत. त्यानुसार, तज्ज्ञांनी तिसर्या लाटेमध्ये कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये 50 टक्के वाढ होण्याचा अंदाज वर्तविला आहे.
Government Is Building A 30 Day Buffer Stock Of Life Saving Corona Drugs As The Country Braces For Imminent 3rd Wave
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App