Monsoon Session First day Lok Sabha and Rajya Sabha adjourned amid uproar by Opposition MPs

Monsoon Session : संसदेच्या दोन्ही सदनांमध्ये विरोधकांचा जोरदार गोंधळ, लोकसभा आणि राज्यसभेची कार्यवाही स्थगित

Monsoon Session : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. संसदेत पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की, कठोर प्रश्न विचारा, पण सरकारला उत्तर देण्याची संधी द्या. संसदेच्या दोन्ही सभागृहांत कार्यवाही सुरू होताच कोरोनाची दुसरी लाट, महागाई, चीन आणि पत्रकार व नेत्यांची हेरगिरी यावरून विरोधकांनी गदारोळ घालायला सुरुवात केली. लोकसभेची कार्यवाही दुपारी साडेतीन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली. Monsoon Session First day Lok Sabha and Rajya Sabha adjourned amid uproar by Opposition MPs


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. संसदेत पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की, कठोर प्रश्न विचारा, पण सरकारला उत्तर देण्याची संधी द्या. संसदेच्या दोन्ही सभागृहांत कार्यवाही सुरू होताच कोरोनाची दुसरी लाट, महागाई, चीन आणि पत्रकार व नेत्यांची हेरगिरी यावरून विरोधकांनी गदारोळ घालायला सुरुवात केली. लोकसभेची कार्यवाही दुपारी साडेतीन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली. या गोंधळामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वरच्या सभागृहातही मंत्रिमंडळाची ओळख करून देता आली नाही. याआधी पंतप्रधान जेव्हा त्यांची मंत्रिपरिषदेचा परिचय देत होते, तेव्हाही मोठा गोंधळ घालण्यात आला. यावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आक्षेप घेतला होता.

राज्यसभेत पंतप्रधान नवीन मंत्र्यांची ओळख करू देऊ शकले नाहीत

राज्यसभेत पुन्हा कामकाज सुरू होताच विरोधी पक्षांच्या सदस्यांनी गोंधळ घातला. राज्यसभेत विरोधी पक्षांच्या सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या मंत्रिमंडळातील नवीन सदस्यांची ओळख करून देऊ शकले नाहीत. त्यांनी मंत्र्यांची यादी सदनाच्या पटलावर ठेवली.

राजनाथ सिंह म्हणाले दु:खद आणि दुर्दैवी

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, पंतप्रधान जेव्हा त्यांच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराविषयी माहिती देताना तेव्हा यादरम्यान गोंधळ घातलेला मी आपल्या 24 वर्षांच्या संसदीय कारकीर्दीत कधीही पाहिले नव्हते. त्यांनी कॉंग्रेस सदस्यांच्या घोषणाबाजीला दु:खद आणि दुर्दैवी म्हटले.

Monsoon Session First day Lok Sabha and Rajya Sabha adjourned amid uproar by Opposition MPs

महत्त्वाच्या बातम्या