माओवादी डाव्या अतिरेक्यांवर सरकारचा अंकुश; हिंसक कारवायांमध्ये ७०% घट; राज्यसभेत माहिती


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशात माओवादी डाव्या अतिरेक्यांच्या हिंसक कारवायांवर सरकारने कठोर कारवाई करत अंकुश लावला आहे, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी आज राज्यसभेत दिली. माओवादी डाव्या अतिरेक्यांच्या हिंसक कारवायांचा आकडेवारीसह लेखाजोखा त्यांनी राज्यसभेत मांडला. Government controls Maoist left-wing extremists; 70% reduction in violent acts; Information in Rajya Sabha

माओवाद्यांच्या हिंसक कारवायांमध्ये 70 % घट झाली असून 2013 ची तुलना केली तर देशभरात आता 9 राज्यांमध्ये 53 जिल्ह्यात माओवाद्यांच्या कारवाया सुरू असल्याचे आढळून आले आहे. 10 राज्यांमधल्या 76 जिल्ह्यांमध्ये या कारवाया सुरू होत्या. परंतु राज्य सरकारी आणि केंद्र सरकार यांच्या धोरणात्मक समन्वयाने आणि नक्षलवादविरोधी पथकांच्या कठोर कारवायांमुळे माओवादी अतिरेक्यांना वेसण घालण्यात यश आले आहे तरी देखील अजून 9 राज्यांच्या 53 जिल्ह्यांत माओवाद्यांच्या हिंसक कारवाई अद्याप सुरू आहेत. त्यांनाही लवकरच अटकाव करण्यात येईल, अशी माहिती नित्यानंद राय यांनी दिली.

2009 मध्ये वर्षभरात पण 2258 माओवादी कारवाया झाल्याच्या नोंदी आहेत, तर 2020 मध्ये 665 कारवाया झाल्याच्या नोंदी आहेत, अशी माहिती देखील गृहराज्यमंत्र्यांनी दिली आहे.

Government controls Maoist left-wing extremists; 70% reduction in violent acts; Information in Rajya Sabha

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात