वृत्तसंस्था
पाटणा : बिहारची कन्या आणि पाटण्याची रहिवासी संप्रितिने यशाचे नवे शिखर सर करत साऱ्या देशवासियांना चकित केले आहे. एकीकडे नोकऱ्यांची वानवा असताना त्याचप्रमाणे वेतनवाढीवर मर्यादा आलेल्या असताना दुसऱ्या बाजूला तिला गुगलने चक्क कोटीचे पॅकेज दिले आहे. यासाठी गुगलने तिची ९ फेऱ्यांत मुलाखत घेतली. Google has given a package of Rs 1 crore to Kanyas of Bihar
या कामगिरीद्वारे तिने केवळ राज्याचेच नाही तर देशाचे नाव उंचावले आहे. नेहरूनगरचे बँक अधिकारी रामाशंकर यादव यांची कन्या संप्रिति यादव यांना गूगलने १.१० कोटी रुपयांचे वार्षिक पॅकेज ऑफर केले आहे.
संप्रिति आता गूगलसाठी काम करणार आहे. दिल्लीच्या टेक्नॉलॉजिकल यूनिव्हर्सिटीतून कॉम्प्यूटर सायन्समध्ये बी.टेक करणाऱ्या यादवला चार कंपन्यांनी ऑफर दिली होती. संप्रितिला मायक्रोसॉफ्टबरोबर काम करायचे होते. परंतु गूगलची ऑफर आली. गूगलच्या टीमकडून मुलाखतीच्या नऊ फेरी झाल्या होत्या.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App