नागरिकांसाठी खुशखबर ! आता देशांतर्गत विमान प्रवास होणार १०० टक्के प्रवाशांसह

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : येणाऱ्या सणासुदीच्या काळात देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी एक खूशखबर आहे. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने कोरोना काळातील प्रवासावरील निर्बंध शिथिल करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.यामध्ये आता येत्या १८ ऑक्टोबरपासून देशांतर्गत विमान प्रवास १०० टक्के प्रवाशांसह करण्यास मंजुरी मिळाली आहे.Good news for citizens! Now there will be domestic flights with 100 per cent passengers

देशातील कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यावर २०२० मध्ये मे महिन्यात ८० टक्के प्रवाशांसह देशांतर्गत विमानसेवा सुरू होती. त्यानंतर पुढे १ जूनपासून प्रवाशांची संख्या ५० टक्क्यांवर आणण्यात आली.नंतर जुलैमध्ये हवाई वाहतूक मंत्रालयाने देशांतर्गत प्रवाशांची संख्या ५० वरून ६५ टक्क्यांवर नेण्याचा निर्णय घेतला होता.मात्र आता कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्यावर कोरोना प्रतिबंधांसह १०० टक्के प्रवांशांसह विमान उडवण्याची मंजुरी देत सणासुदीच्या काळात विमान प्रवास करणाऱ्या नागरिकांना दिलासा दिला आहे.

मागील काही दिवसांपासून देशांतर्गत विमान सेवांवरील निर्बंध हळूहळू शिथिल करण्यात आले आहे. १० ऑक्टोबर पासून शिर्डीचे विमानतळ देखील सुरू झाले. सुमारे सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर १० तारखेला चेन्नईहून १६७ प्रवासी घेऊन पहिले विमान शिर्डी विमानतळावर दाखल झाले.

दरम्यान मंगळवार ( दि. १२ ) रोजी दिल्लीहून स्पाईसजेट कंपनीचे विमान १३० प्रवाशांना घेऊन शिर्डीत दाखल झाले. तर हेच विमान शिर्डीहून ४० प्रवासी घेऊन दिल्लीकडे रवाना झाले. यावेळी विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यावेळी विमानतळाचे डायरेक्टर सुशीलकुमार श्रीवास्तव यांनी सांगितले की , हैद्राबाद, मुंबई व बेंगलोर या ठिकाणाहून शिर्डीसाठी विमानसेवा सुरू होणार आहे.

Good news for citizens! Now there will be domestic flights with 100 per cent passengers

महत्त्वाच्या बातम्या