शरद शतम योजना! देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी वर्षातून एकदा होणार मोफत आरोग्य चाचणी: धनंजय मुंडे


विशेष प्रतिनिधी

बीड: मंत्री धनंजय मुंडे यांनी बीडमध्ये पत्रकारांशी बोलताना शरद शतम योजना प्रस्तावित केल्याची घोषणा केली. ज्येष्ठ नागरिकांना बळावणारे आजार वेळेवर निदान करता यावे यासाठी ही योजना प्रस्तावित केली आहे.

Sharad Shatam Yojana! Free medical test for senior citizens once in a year: Dhananjay munde

वयाच्या ६५ वर्षांवरील लोकांना विविध आजार होतात. आधीच आजारी असलेल्यांचा त्यावरील खर्च वाढत जातो. आरोग्य तपासणीसाठी हजारो रुपयांची आवश्यकता भासते. परंतु सर्वांनाच आर्थिक परिस्थितीमुळे आरोग्य चाचणी करून घेणे शक्य होत नाही.


Dhananjay Munde: करुणा मुंडेवर अॅट्रोसिटी -भिमसैनिकांचे मात्र करूणांना समर्थन-कायद्याचा गैरवापर-दलितांची बदनामी:करूणा मुंडेच्या जामिनावर आज सुनावणी


जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे अवचीत्य साधून मंत्री धनंजय मुंडे यांनी या योजनेची घोषणा केली. राज्यातील हजारो ज्येष्ठ नागरिकांना या योजनेमुळे लाभ होणार आहे. या शरद शतम योजनेअंतर्गत ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य चाचण्या वर्षातून एकदा मोफत केल्या जातील. आर्थिक अडचणींमुळे जे लोक उपचार घेऊ शकत नाहीत, त्यांना वेळेवर उपचार मिळण्यासाठी ही योजना उपयोगी ठरणार आहे.

याबरोबरच आरोग्य विमा कवच ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी सादर करण्यात आली आहे. या योजनेमुळे आरोग्य व इतर गरजा पूर्ण करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना मदत होईल.

Sharad Shatam Yojana! Free medical test for senior citizens once in a year: Dhananjay munde

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!