आनंदाची बातमी! दिल्ली-मुंबई अंतर आता अवघ्या बारा तासांमध्ये कापता येणार. दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे नरिमन पॉइंटपर्यत नेण्याचा विचार!- नितीन गडकरी


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: जगातील सर्वात लांब महामार्ग दिल्ली-मुंबई एक्सप्रेस हायवेचे बांधकाम लवकरच चालू होणार आहे. असे १७ सप्टेंबर रोजी एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी जाहीर केले आहे. नितीन गडकरी म्हणाले की,’ जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट पर्यंत जाणारा हा मार्ग १३८० किलोमीटर लांबीचा असेल. आता हा मार्ग नरिमन पॉइंट पर्यंत नेण्याचा विचार चालू आहे.’

Good news! Delhi to Mumbai distance now can be covered in just 12 hours. Planning to take Delhi-Mumbai expressway to nariman point.

हा प्रकल्प २०२२ पर्यंत पूर्ण होईल आणि हा एक्सप्रेस वे जगातील सर्वात मोठा एक्सप्रेस वे असेल. सध्या मुंबई ते दिल्ली ट्रकने प्रवास केल्यास ४८ तास व कारने २४ ते २६ तास लागतात. हायवे पूर्ण झाल्यानंतर हेच अंतर ट्रकसाठी १८ ते २० व कारसाठी १२ ते ३० तास एवढाच वेळ लागेल. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची पाहणी करण्याकरिता नितीन गडकरी थेट हेलिकॉप्टरने गेले होते.


कधीपर्यंत पदावर राहू याची शाश्वती नसल्याने अनेक मुख्यमंत्री दु:खी; नितीन गडकरींची जोरदार टोलेबाजी


दिल्ली ते मुंबई हे अंतर १४५० किलोमीटर होते. तेच आता १२५० पर्यंत होणार आहे. हा महामार्ग राजस्थान, मध्य प्रदेश व गुजरात या राज्यांच्या आदिवासी जिल्ह्यांमधून जाणार आहे असेही गडकरी यांनी सांगितले. त्यामुळे या भागांचा विकास होईल. नवीन रोजगारांच्या संधी निर्माण होतील. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि नितीन गडकरी हे या कामाची पाहणी करून आले आहेत. याप्रसंगी बोलताना गडकरी म्हणाले की, “संपूर्ण देशासाठी हे अभिमानास्पद आहे”.

Good news! Delhi to Mumbai distance now can be covered in just 12 hours. Planning to take Delhi-Mumbai expressway to nariman point.

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण