कधीपर्यंत पदावर राहू याची शाश्वती नसल्याने अनेक मुख्यमंत्री दु:खी; नितीन गडकरींची जोरदार टोलेबाजी


वृत्तसंस्था

जयपूर : भाजपाने गेल्या काही महिन्यात चार राज्यांमधील मुख्यमंत्री बदलले असल्याने त्यावर टोलेबाजी केलेल्या वरिष्ठ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वक्तव्याची चांगलीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पण केवळ भाजपमध्येच नव्हे तर काँग्रेसमध्येही छत्तीसगड, राजस्थान यांच्या मुख्यमंत्र्यांविषयी नाराजी आणि बंडखोरी आहे. या पार्श्वभूमीवर गडकरींचे विधान राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे मानले जात आहे.

शेवटच्या पायरीवर उभ्या व्यक्तीच्या आयुष्यातही बदल घडवणं हाच लोकशाहीचा मुख्य हेतू असल्याचं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. नितीन गडकरी सोमवारी राजस्थानमधील एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी आपल्या पक्षातील नेत्यांसह इतरांनाही टोले लगावले असून त्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. आमदार, मंत्री, मुख्यमंत्री सगळेच दु:खी आहेत. मुख्यमंत्र्यांना आपण कधीपर्यंत राहू आणि कधी जाऊ याचा भरवसा नसल्याने दु:खी आहेत टोला त्यांनी लगावला.

भाजपाने गेल्या काही महिन्यात चार राज्यांमधील मुख्यमंत्री बदलले असल्याने नितीन गडकरी यांच्या वक्तव्याची चांगलीच चर्चा आहे. सोमवारी विजय रुपाणी यांच्या जागी भूपेंद्र पटेल यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

“समस्या सर्वांसोबत आहे, प्रत्येकजण दु:खी आहे. आमदार मंत्री होऊ शकले नाहीत म्हणून दु:खी आहेत. मंत्री झाले तर चांगलं खात मिळालं नाही म्हणून दु:खी आहेत. ज्या मंत्र्यांना चांगलं खातं मिळालं ते मुख्यमंत्री होऊ शकलो नाही म्हणून दु:खी आहेत. आणि मुख्यमंत्री दु:खी आहेत कारण कधीपर्यंत पदावर राहू हे माहिती नाही,” असं नितीन गडकरींनी यावेळी म्हटलं.नितीन गडकरी यांनी यावेळी व्यंग्यकार शरद जोशी यांचा उल्लेख करत सांगितलं की, त्यांनी लिहिलं होतं जे राज्यात काम करत नाहीत, त्यांना दिल्लीत पाठवण्यात आलं. जे दिल्लीत कामाचे नव्हते त्यांना राज्यपाल बनवण्यात आलं आणि जे तिथेही कामाचे नव्हते त्यांना राजदूत बनवण्यात आलं. भाजपाध्यक्ष असताना दु:खी नाही अशी एकही व्यक्ती आपल्याला भेटली नाही असंही यावेळी ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, मला एका पत्रकाराने तुम्ही इतक्या मजेत कसे राहू शकता असं विचारलं होतं. मी सांगितलं, मी भविष्याची चिंता करत नाही. जो भविष्याची चिंता करत नाही तो आनंदी राहतो. एकदिवसीय क्रिकेटप्रमाणे खेळत राहा. मी सचिन तेंडूलकर आणि सुनील गावसकर यांना लांब षटकार मारण्याचं रहस्य विचारलं होतं तेव्हा त्यांनी हा कौशल्याचा भाग असल्याचं सांगितलं होतं. त्याचप्रमाणे राजकारणदेखील कौशल्य आहे.

विरोधी पक्षात राहणारे सत्तेत येऊनही विरोधकांप्रमाणे वागतात

गडकरींना म्हणाले की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांना वॉटरगेट प्रकरणानंतर पद सोडावं लागलं होतं. राष्ट्राध्यक्ष पदावरुन दूर झाल्यानंतर त्यांना लोकांना कॉलनीत राहण्यासाठी घर दिलं नव्हतं. निक्सन यांनी व्यक्ती पराभव झाल्याने नव्हे तर लढा न दिल्याने संपते असं लिहिलं होतं. आपल्याला आयुष्यात लढायचं आहे. कधी कधी आपण सत्तेत असतो, तर कधी विरोधी पक्षात असतो. हे सुरुच असतं. जे जास्त वेळ विरोधी पक्षात असता ते सत्तेत येऊनही विरोधी पक्षाप्रमाणे वागतात. आणि जे जास्त काळ सत्तेत राहणारे विरोधी पक्षात जाऊनही सत्ते असल्याप्रमाणे वागतात. त्यांना सवय लागलेली असते”.

…गडकरींना जेव्हा काँग्रेस प्रवेशाची ऑफर देण्यात आली होती

नितीन गडकरी यांनी यावेळी आपल्याला काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची ऑफर मिळाली होती असा खुलासा केला. “नागपूरमधील काँग्रेसचे नेते डॉक्टर श्रीकांत माझे चांगले मित्र आहेत. त्यांनी १७ हून अधिक विषयांमध्ये पीजी केली आहे. त्यावेळी जेव्हा मी निवडणूक हारलो होतो तेव्हा भाजपाची स्थिती आज आहे तशी नव्हती. त्यावेळी त्यांनी मला नितीन तू चांगला आहेस, पण तुझ्या पक्षाचं भवितव्य नाही.. तू काँग्रेसमध्ये ये असं सांगितलं होतं. त्यावेळी मी नम्रपणे नकार दिला होता. चढ-उतार येत असतात, पण आपण आपल्या विचारधारेशी निष्ठा राखली पाहिजे,” असं यावेळी त्यांनी सांगितलं.

Nitin Gadkari Says From Mla To Cm Everyone Is Unsatisfied

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण