तालिबानकडून आश्वासनांना हरताळ, अफगाण सैनिकांची दिवसाढवळ्या हत्या


वृत्तसंस्था

जीनिव्हा : सत्ता मिळाल्यानंतरही तालिबानी दहशतवादी अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलांत काम केलेल्या सैनिकांची सूड म्हणून हत्या करत असल्याचा दावा संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेच्या प्रमुख मिशेल बॅशलेट यांनी केला आहे. Taliban killed afgahan solders

बॅशलेट म्हणाल्या की, तालिबानच्या उक्ती आणि कृतीत फरक आहे. तालिबानची सत्ता आल्याने अफगाणिस्तानची अवस्था आणखी बिकट झाली आहे. अफगाणिस्तानमधील आधीच्या सरकारसाठी आणि अमेरिकेसाठी काम केलेल्यांवर तालिबानचा राग असून घरोघर जाऊन अशा व्यक्तींचा घरोघर जाऊन शोध घेतला जात आहे.माजी सैनिकांना आणि सरकारी अधिकाऱ्यांना, त्यांच्या कुटुंबीयांना पकडून नेले जात आहे. काही वेळा त्यांना सोडून दिले जाते, तर काही वेळा हे लोक मृतावस्थेत आढळून येतात.

पाच ते सहा शहरांमध्ये तालिबानी दहशतवाद्यांची ही शोधमोहिम सुरु असल्याचा दावाही बॅशलेट यांनी केला. काही स्वयंसेवी संस्थांच्या कार्यालयांवरही तालिबान्यांनी छापे टाकले असल्याचा आरोप त्यांनी केला.

Taliban killed afgahan solders

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण