अब्बाजान शब्दावरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अडचणीत , विरोधात याचिका दाखल


वृत्तसंस्था

मुजफ्फरपूर : अब्बाजान शब्दाच्या वापरावरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरुद्ध याचिका दाखल करण्यात आली आहे.
याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते तमन्ना हाश्मी यांनी मुजफ्फरपूर येथील मुख्य न्यायालयीन दंडाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. योगी आदित्यनाथ यांनी रविवारी कुशीनगर येथील एका कार्यक्रमात हा शब्द उच्चारला होता. ते म्हणाले होते की, २०१७ मध्ये मी सत्तेवर आल्यानंतरच उत्तर प्रदेशातील सार्वजनिक धान्यवितरण व्यवस्था परिणामकारक बनली. त्याआधी गरिबांसाठी राखून ठेवण्यात आलेले धान्य जे अब्बाजान म्हणायचे त्यांच्याकडून खाल्ले जायचे. FIR against CM Yogi Aditynath


पंतप्रधान मोदींनी सात वर्षांत तर योगी आदित्यनाथांनी चार वर्षांत घेतली नाही एकही सुट्टी, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी केले कौतुक


हाश्मी यांनी याआधीही अनेक राजकीय नेत्यांविरुद्ध असंख्य याचिका दाखल केल्या आहेत. धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपावरून योगींवर कारवाई व्हावी अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली आहे. योगी यांच्या वक्तव्यामुळे आपण ज्या मुस्लीम समाजाच्या आहोत त्यांचा अपमान झाल्याचा आरोप हाश्मी यांनी केला.

FIR against CM Yogi Aditynath

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण