अफगाण निर्वासितांना युरोपीय देशांनी प्रवेश द्यावा, युनियनच्या प्रमुखांचे आवाहन


वृत्तसंस्था

माद्रिद : काबूलहून आणल्या जाणाऱ्या अफगाण निर्वासितांना प्रवेश द्यावा, असे आवाहन युरोपीय युनियनच्या (इयू) प्रमुख उर्सुला वॉन डर लेयेन यांनी सदस्य देशांना केले. संघटनेकडून आर्थिक पाठिंब्याचे आश्वासनही त्यांनी दिले. Give entery to Afghan peopels

त्या म्हणाल्या की अफगाणिस्तानमधील मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व सदस्य देशांनी पुरेसा कोटा नक्की करावा. त्यामुळे त्याची गरज असलेल्यांना संरक्षण मिळेल. निर्वासितांना स्थलांतर करण्यासाठी व्यवस्था उभी करणाऱ्या आणि मदत करणाऱ्या देशांना पाठिंबा देण्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद करण्यास युरोपीय महासंघ तयार होत आहे.जे परत अफगाणिस्तानात जाऊ शकत नाहीत किंवा मायदेशात राहू शकत नाहीत त्यांच्यासाठी आपल्याला पर्याय द्यावा लागेल. याचा अर्थ आपली गरज असलेल्यांसाठी आपल्याला सर्वप्रथम जागतिक पातळीवर वैध आणि सुरक्षित मार्ग निर्धारित करावाच लागेल.

गेला सुमारे एक आठवडा पाश्चात्त्य देश त्यांचे नागरिक तसेच त्यांना मदत केल्याने तालिबानच्या रडारवर असलेल्या अफगाण नागरिकांची सुटका करण्यासाठी धडपडत आहेत.

Give entery to Afghan peopels

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय