अफगाणिस्तानमधून तब्बल एक लाख २० हजारंहून अधिक नागरिकांची सुटका, सैन्य माघारीचे बायडेन यांच्याकडून पुन्हा समर्थन


विशेष प्रतिनिधी

वॉशिंग्टन – अफगाणिस्तानमधून एक लाख २० हजारपेक्षा जास्त अफगाणी, अमेरिकी व अन्य देशांच्या नागरिकांची अमेरिकेने सुखरूप सुटका केली आहे.अफगाणिस्तानमधील ही सुटका मोहीम कमालीची यशस्वी ठरल्याचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी म्हटले आहे.Almost 1 lach people resued from Afghanistan by USA

अफगाणिस्तानमधील अमेरिकी सैन्याला परत बोलाविण्याचा निर्णय हा अत्यंत योग्य, विचारपूर्वक घेतलेला व सर्वोत्तम होता, असे ठाम प्रतिपादन बायडेन यांनी केले. ते म्हणाले हे युद्ध व सुटका मोहिमेची मुदत कायमस्वरूपी वाढविणार नव्हतो. हे युद्ध समाप्त करण्याचे वचन अमेरिकी नागरिकांना दिले होते, व त्याचा सन्मान करीत ते मी पाळलेही.अफगाणिस्तानमधील युद्ध समाप्त झाले आहे. ते संपविण्याच्या निर्णयाला सामोरे जाणारा मी अमेरिकेचा चौथा अध्यक्ष आहे. हा निर्णय प्रत्यक्षात आणल्याची जबाबदारी मी घेत आहे.तालिबानसोबत अमेरिकेने केलेल्या करारासाठी बायडेन यांनी माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दोषी ठरवले.

त्यांच्या काळात १ मे रोजी तालिबानशी प्रथम वाटाघाटी झाल्या होत्या. पण अमेरिकेने माघार घेतली नाही तर तालिबान सर्व मार्गांनी अमेरिकेला विरोध करणार हेही ठरले होते, असा दावा बायडेन यांनी केला.

Almost 1 lach people resued from Afghanistan by USA

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण