वृत्तसंस्था
नवी दिल्ली : राजस्थानमध्ये निर्माण झालेल्या राजकीय संकटानंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. पक्षात आता केसी वेणुगोपाल, मल्लिकार्जुन खरगे, मुकुल वासनिक आणि दिग्विजय सिंह यांच्या नावावर चर्चा सुरू झाली आहे. या नेत्यांपैकी कुणीही एक 30 सप्टेंबरआधी अर्ज दाखल करू शकेल.Gehlot out of Congress presidential election Venugopal, Kharge, Digvijay, Wasnik in race
सीडब्ल्यूसीच्या एका सदस्याने सांगितले की, गेहलोत यांनी ज्या पद्धतीने पक्षनेतृत्वाला अपमानित केले, त्यानंतर त्यांच्या निवडणुकीची शक्यता समाप्त झाली. यावर ते विनोदी शैलीत म्हणाले की, आमदारांना मी मुख्यमंत्रिपदी हवा असेन तर आता मुख्यमंत्रीच राहीन.
आमदारांशी चर्चा करून दिल्लीत परतलेले राजस्थानचे प्रभारी, सरचिटणीस अजय माकन म्हणाले, मुख्यमंत्र्यांचा उत्तराधिकारी निवडण्यासाठी ठिकाण, वेळ ठरली होती. अशा स्थितीत समांतर बैठक करणे शिस्तभंग आहे. आमदारांनी ज्या अटी घातल्या त्या अयोग्य आहेत.
राजस्थानमध्ये पुढील मुख्यमंत्री कोण होईल, यावरून राजकीय उलथापालथ झाली. सीएम अशोक गेहलोत व सचिन पायलट गटात मोठी रस्सीखेच सुरू होती. मात्र, या काळात ना गेहलोत यांचा संदेश मीडियात आला ना पायलट यांचा. गेहलोत गटाने रविवारी आघाडी उघडली होती. सोमवारी त्यात थोडी नरमाई दिसून आली आहे..
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App