निर्मलाताईंच्या ‘मिशन बारामती’ दौऱ्यावर सुप्रियाताईंचा वेगवान दौऱ्याचा उतारा


प्रतिनिधी

पुणे : भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे बारामती लोकसभा मतदारसंघाची विशेष जबाबदारी सोपविल्यानंतर त्यांचा तीन दिवसांचा बारामती दौरा झाला. या दौऱ्याला भाजपने “मिशनिर्मलाताईंच्या ‘मिशन बारामती’ दौऱ्यावर सुप्रियाताईंचा वेगवान दौऱ्याचा उतारान बारामती” म्हटले. आता या “मिशन बारामती” दौऱ्यावर उतारा म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या मतदारसंघाचा वेगवान दौरा केला आहे. Supriyatai’s quick tour transcript on Nirmalatai’s ‘Mission Baramati’ tour

निर्मला सीतारामन यांनी आपल्या तीन दिवसांच्या दौऱ्यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातील ठळक गावांना भेटी दिल्या. वेगवेगळ्या समाज घटकांच्या गाठीभेटी घेतल्या. त्याचबरोबर मोरगाव, जेजुरी यासारख्या सुप्रसिद्ध देवस्थानांना देखील भेटी दिल्या. या दौऱ्याची देशपातळीवरच्या राजकीय वर्तुळात चर्चा झाली. त्यानंतर या दौऱ्याचा “राजकीय इफेक्ट” म्हणून खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती दौरा सुरू केला. या दौऱ्यात त्यांनी पुणे शहरालगतच्या गावांना भेटी दिल्या. छोट्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये त्या सहभागी झाल्या. त्याचबरोबर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी त्यांनी अनेक गावातल्या ग्रामदेवतांचे दर्शन घेतले.

 

सुप्रिया सुळे यांनी रविवारी उंड्री परिसरातील 13 सोसायट्यांना धावत्या भेटी दिल्या, तर सोमवारी पहिल्यांदाच एकाच दिवशी तब्बल 13 गावांना भेटी दिल्या. या दौऱ्यात त्यांनी बारामती तालुक्यातील डोर्लेवाडीला भेट दिली त्या डोर्लेवाडी त्यांच्यासमोर गावातल्या दोन गटांमध्ये रस्ता रुंदीकरणावरून वाद झाला. सुप्रिया सुळे यांनी मध्यस्थी करून त्या प्रश्नावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.

भाजपने 2024 च्या निवडणुकीसाठी बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी निर्मला सीतारामन यांच्यासारख्या अतिवरिष्ठ नेत्याकडे दिल्याने हा हाय प्रोफाईल मतदारसंघ राष्ट्रीय पातळीवर वेगळ्याच राजकीय समीकरणात समोर आला आहे. राहुल गांधींच्या अमेठी मतदार संघाची जबाबदारी भाजपने विद्यमान केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे सोपवली होती. त्यांनी त्या मतदारसंघात विशेष लक्ष घालून 2019 च्या निवडणुकीत यश मिळवले. राहुल गांधींचा पराभव केला. तशीच अपेक्षा शरद पवारांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती मतदारसंघासाठी भाजपमधून व्यक्त होत आहे. निर्मला सीतारामन यांच्यासारख्या केंद्रीय अर्थमंत्री पदावर असलेल्या अति महत्त्वाच्या नेत्याकडे ही जबाबदारी सोपवली आहे. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे बारामती मतदारसंघाचा सुरुवातीचा वेगवान दौरा केला आहे.

Supriyatai’s quick tour transcript on Nirmalatai’s ‘Mission Baramati’ tour

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय