G20 Summit: पंतप्रधान मोदी आज ब्रिटनला ; हवामान बदल आणि पर्यावरणावरील परिषद;काय आहे परिषदेचा अजेंडा?


पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी G20 शिखर परिषदेच्या दुसऱ्या सत्रात सहभागी होण्यासाठी ग्लासगो, स्कॉटलंड येथे रवाना होणार आहेत. ही COP26 (Conference of Parties) परिषद हवामान बदल आणि पर्यावरण (Global Climate Change) या विषयावर होणार आहे. G20 Summit: Prime Minister Modi to Britain today; Conference on Climate Change and Environment; What is the agenda of the conference?


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी G20 शिखर परिषदेच्या दुसऱ्या सत्रात सहभागी होण्यासाठी ग्लासगो, स्कॉटलंड येथे रवाना होणार आहेत. ही COP26 (Conference of Parties) परिषद हवामान बदल आणि पर्यावरण (Global Climate Change) या विषयावर होणार आहे. जवळजवळ 200 देशांचे (United Nations) प्रमुख या परिषदेत उपस्थित असतील. ही हवामान परिषदे G20 शिखर परिषदेचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणून पाहिले जात आहे. G20 Summit PM Modi to visit UK for Climate Change Conference

G20 ब्लॉक मध्ये जागतिक हरितगृह वायू उत्सर्जनाचा (Greenhouse gases emissions) अंदाजे 80 टक्के वाटा हा ब्राझील, चीन, भारत, जर्मनी आणि युनायटेड स्टेट्स यांचा आहे. जो शास्त्रज्ञांच्या मते हवामान आपत्ती टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात कमी करणे आवश्यक आहे. चीन आणि युनायटेड स्टेट्स नंतर भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा हरितगृह वायू उत्सर्जित करणारा देश आहे. त्यामुळे, 31 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या COP26 शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींचा सहभाग फार महत्त्वाचा आहे.

पंतप्रधान मोदी सध्या G20 शिखर परिषदेच्या पहिल्या सत्रासाठी रोममध्ये आहेत. शनिवारी त्यांनी जागतिक नेत्यांसह जागतिक अर्थव्यवस्था आणि आरोग्यावर चर्चा केली. ट्विटरवरील त्यांच्या अधिकृत हँडलवर, पीएम मोदी म्हणाले की जी -20 शिखर परिषदेच्या भेटी “विस्तृत आणि फलदायी” होत्या.

इटालिच्या प्रमुख मारियो द्राघी यांच्या निमंत्रणावरून सध्या पंतप्रधान मोदी रोममध्ये आहेत. त्यांच्या दोन दिवसांच्या या दौऱ्याचा समारोप करून आज ते युनायटेड किंगडममधील ग्लासगो येथे जाणार आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी पंतप्रधान मोदींना आमंत्रण दिले आहे. युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज (UNFCCC) च्या अधिकृत वेळापत्रकानुसार COP26 परिषद 31 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे आणि 12 नोव्हेंबर चालेल.

G20 Summit: Prime Minister Modi to Britain today; Conference on Climate Change and Environment; What is the agenda of the conference?

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात