पंजाब घोटाळ्यातला आरोपी चोक्सी क्युबाला बोटीने पळून जाताना सापडला जाळ्यात

भारतीय बँकांना हवा असणारा फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सी वेस्ट इंडिज बेटांवरुन पसार झाल्याच्या बातम्या येऊन चोवीस तास पूर्ण होत नाहीत तोवर आणखी एक बातमी पश्चिमेकडून आली आहे. सीबीआय आणि ईडीने फास आवळल्याने चोक्सी क्युबाला पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. त्याच्याविरोधात लुक आऊट नोटिस असल्याने स्थानिक पोलिसांनी त्याला पकडले. या घटनेमुळे चोक्सीला भारतात आणले जाण्याची शक्यता वाढली आहे. Fugitive Jeweller Mehul Choksi’s Dramatic Capture After Escape By Boat, The 62-year-old had gone missing yesterday from the Caribbean island nation of Antigua and Barbuda, Choksi accused in Punjab National Bank loan fraud case of ₹ 14,000 crore


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेच्या कर्ज फसवणूकीप्रकरणी भारतासाठी मोस्ट वॉंटेड असणारा फरार हिरे व्यापारी मेहुल चोकसीला पुन्हा एकदा सुरक्षा यंत्रणांनी ताब्यात घेतले आहे.

पंजाब नॅशनल बँकेच्या चौदा हजार कोटी रुपयांच्या अफरातफरीप्रकरणी भारतीय तपास यंत्रणा चोक्सीच्या मागे हात धुवून लागल्या आहेत.कॅरेबियन बेटांवरील अँटिग्वा आणि बार्ब्युडा येथून चोक्सी नुकताच बेपत्ता झाला होता.



 

तो क्युबाला पळून जाण्याच्या प्रयत्नात असल्याचे सांगितले होते. त्याप्रमाणे क्युबाच्या वाटेवर असताना डॉमेनिका येथून चोक्सीला ताब्यात घेण्यात आले. बासष्ट वर्षीय चोक्सी 2018 मध्ये भारतातून पळून गेला होता.

कॅरेबियन बेटांवरुन चोक्सीला ताब्यात घेण्यासाठी सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) फास आवळला आहे. त्यामुळे चोक्सी क्युबात आसरा मिळवण्याचा प्रयत्न करत होता.

त्यांची सुटका करण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांची बेपत्ता झाली आहे. ही कंपनी भारताच्या दुसर्‍या क्रमांकाच्या सरकारी मालकीच्या बँकेत झालेल्या 14,000 कोटींच्या घोटाळ्याची चौकशी करीत आहे.

सूत्रांनी सांगितले की, चोक्सी हे बोटीतून डॉमेनिका येथे पोहोचले होते. त्यांच्याविरूद्ध लुकआउट नोटीस काढली गेली होती. त्यामुळे स्थानिक पोलिसांनी त्याला पकडले. सध्या तो डॉमेनिका पोलिसांच्या ताब्यात आहे.

त्याला पकडल्याचे सीबीआय आणि ईडीला कळवण्यात आले आहे. लवकरच त्याला अँटिग्वाच्या ताब्यात दिले जाणार आहे. चोक्सीने पळून जाण्याचा प्रयत्न केल्यामुळे तिथल्या स्थानिक कोर्टात त्याची बाजू कमकूवत झाली असून लवकरच त्याला भारतात आणले जाण्याची शक्यता वाढली आहे.

दरम्यान, चोक्सी अँटिग्वामधूनही पळाला असल्याची कोणतीही खात्रीशीर माहिती नसल्याचे या बेटाचे पंतप्रधान गॅस्टन ब्राऊन यांनी सांगितले होते. चोक्सीच्या विरोधात अँटिग्वा कोर्टात दोन खटले आहेत.

त्याचे अँटिग्वाचे नागरिकत्त्व रद्द करावे आणि त्याचे प्रत्यार्पण भारताला करावे यासाठीची सुनावणी चालू आहे. या खटल्यासाठी चोक्सीने ब्रिटीश वकिलाची नेमणूक केली आहे. पीटीआय या भारतीय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, “चोक्सीचे कुटुंबीयदेखील मेहूलच्या सुरक्षेबद्दल काळजीत आहेत.

चोक्सीच्या घडामोडींवर ते लक्ष ठेवून आहोत.” दरम्यान, पंजाब बँकेचा घोटाळा उघड होण्यापूर्वी दोन महिने चोक्सीने अँटीग्वाचे नागरिकत्त्व घेतल्याची माहिती समोर आली आहे. चोक्सी आणि त्याचा पुतण्या सेलिब्रेटी ज्वेलर नीरव मोदी यांनी 2018 मध्ये भारतातून पलायन केले होते.

Fugitive Jeweller Mehul Choksi’s Dramatic Capture After Escape By Boat, The 62-year-old had gone missing yesterday from the Caribbean island nation of Antigua and Barbuda, Choksi accused in Punjab National Bank loan fraud case of ₹ 14,000 crore

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात