Fugitive Defaulter Vijay Mallya : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील कन्सोर्टियमने भारतातून फरार झालेल्या व्यावसायिक विजय मल्ल्याच्या 5600 कोटी रुपयांच्या संपत्तीचा लिलाव करण्याचे ठरवले आहे. बँकांकडून 9 हजार कोटींपेक्षा जास्त कर्ज देऊन परदेशात पळून गेलेल्या मल्ल्याच्या मालमत्तांचा लिलाव करण्यास पीएमएलए कोर्टाने बँकांना परवानगी दिली आहे. पंजाब नॅशनल बँकेचे एमडी मल्लिकार्जुन राव यांनी पीएमएलए कोर्टाच्या निर्णयाविषयी माहिती दिली आहे. Fugitive Defaulter Vijay Mallya 5600 Crore Assets To be Auctioned By Bank Consortium
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील कन्सोर्टियमने भारतातून फरार झालेल्या व्यावसायिक विजय मल्ल्याच्या 5600 कोटी रुपयांच्या संपत्तीचा लिलाव करण्याचे ठरवले आहे. बँकांकडून 9 हजार कोटींपेक्षा जास्त कर्ज देऊन परदेशात पळून गेलेल्या मल्ल्याच्या मालमत्तांचा लिलाव करण्यास पीएमएलए कोर्टाने बँकांना परवानगी दिली आहे. पंजाब नॅशनल बँकेचे एमडी मल्लिकार्जुन राव यांनी पीएमएलए कोर्टाच्या निर्णयाविषयी माहिती दिली आहे.
पीएमएलए कोर्टाने फरार उद्योजक विजय मल्ल्या यांची 5,600 कोटींची संपत्ती आतापर्यंत अंमलबजावणी संचालनालयाकडे असलेल्या बँकांना हस्तांतरित करण्याचे आदेश दिले आहेत. कोर्टाच्या आदेशानंतर पंजाब नॅशनल बँकेचे एमडी मल्लिकार्जुन राव म्हणाले की, आता बँक ही संपत्ती विकेल. यापूर्वी 24 मे रोजी कोर्टाने 4233 कोटी आणि 1 जून रोजी 1411 कोटींची संपत्ती बँकांना देण्याचे आदेश दिले होते.
एसबीआयच्या नेतृत्वात असलेल्या 17 बॅंकांच्या कन्सोर्टियमने विजय मल्ल्याला 9,000 कोटींपेक्षा जास्त कर्ज दिले होते, ज्याची परतफेड झाली नाही. विजय मल्ल्या आता परदेशात वास्तव्याला आहे. मल्ल्याविरोधात देशातील अनेक न्यायालयांत खटले सुरू असून कोर्टाने त्याला फरार घोषित केले आहे. आता त्याची मालमत्ता बँकांकडून कर्जाच्या वसुलीसाठी विकण्यात येत आहे.
Fugitive Defaulter Vijay Mallya 5600 Crore Assets To be Auctioned By Bank Consortium
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App