Kotak Mahindra Group : कोरोना संकटाच्या काळात कोटक महिंद्रा समूहाने आपल्या कर्मचार्यांना मदत करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. कोटक महिंद्रा ग्रुपने म्हटले की, जर 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 पर्यंत त्यांच्या कर्मचार्यांपैकी एखाद्याचा मृत्यू झाला किंवा घडला तर कंपनी त्यांच्या कुटुंबाला दोन वर्षे वेतन देणार आहे. ग्रुपमधील सर्व 73 हजार कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. याची सुरुवात जून 2021 पासून केली जात आहे. After Tata And Reliance Now kotak mahindra group announces 2 years full salary for deceased employees
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना संकटाच्या काळात कोटक महिंद्रा समूहाने आपल्या कर्मचार्यांना मदत करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. कोटक महिंद्रा ग्रुपने म्हटले की, जर 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 पर्यंत त्यांच्या कर्मचार्यांपैकी एखाद्याचा मृत्यू झाला किंवा घडला तर कंपनी त्यांच्या कुटुंबाला दोन वर्षे वेतन देणार आहे. ग्रुपमधील सर्व 73 हजार कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. याची सुरुवात जून 2021 पासून केली जात आहे.
कंपनीने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले होते की, पॉलिसी अंतर्गत मृत्यूचे कारण काहीही असू शकते. त्यांचा मृत्यू कोरोनामुळे किंवा इतर कोणत्याही कारणास्तव झाला तरी त्यास याचा फायदा कोणत्याही परिस्थितीत मिळेल. त्याशिवाय नामित व्यक्तीला वार्षिक बोनसचा लाभही मिळेल. 2020-21 या आर्थिक वर्षासाठी कंपनीकडून वार्षिक बोनस देण्यात येणार आहे. गेल्या आर्थिक वर्षात एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबालाही याचा फायदा मिळेल. याशिवाय सध्याच्या आर्थिक वर्षात जोडीदार व अल्पवयीन मुलांना वैद्यकीय विम्याचा लाभही मिळणार आहे.
कोरोना संकटाच्या वेळी अशा घोषणा देशातील इतरही बड्या कंपन्यांनी केल्या आहेत. देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने कोरोनामुळे कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास पुढील 5 वर्षे कुटुंबाला पगार देण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर कुटुंबाला दहा लाख रुपयांपर्यंतची एकरकमी आर्थिक मदतही दिली जाईल. याशिवाय पदवीपर्यंत मुलांच्या शिक्षणाचा आणि कुटुंबाचा खर्च कंपनी उचलणार आहे.
त्यापूर्वी टाटा स्टील कंपनीने आपल्या कर्मचार्यांसाठी मोठी घोषणा केली होती. कंपनीने म्हटले की, कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतरही 60 वर्षांची सेवा पूर्ण होईपर्यंत परिवारास संपूर्ण पगार दिला जाईल. यासह निवास आणि वैद्यकीय सुविधादेखील पुरविल्या जातील. इतकेच नाही, तर मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्चही कंपनी उचलणार आहे.
After Tata And Reliance Now kotak mahindra group announces 2 years full salary for deceased employees
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App