अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांचे फेसबुक खाते 2 वर्षांसाठी निलंबित; ट्रम्प म्हणाले, हा 75 दशलक्ष लोकांचा अपमान

facebook suspended former us president donald trumps accounts for two years

Donald Trump : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अकाउंट दोन वर्षांसाठी फेसबुकने निलंबित केले आहे. दोन वर्षांचा कालावधी 7 जानेवारी 2021 पासून गणला जाईल. त्याच दिवशी ट्रम्प यांचे खाते प्रथम निलंबित करण्यात आले होते. फेसबुकचे उपाध्यक्ष (ग्लोबल अफेयर्स) निक क्लेग यांनी शुक्रवारी एका ब्लॉग पोस्टद्वारे ही माहिती दिली. facebook suspended former us president donald trump accounts for two years


विशेष प्रतिनिधी

वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अकाउंट दोन वर्षांसाठी फेसबुकने निलंबित केले आहे. दोन वर्षांचा कालावधी 7 जानेवारी 2021 पासून गणला जाईल. त्याच दिवशी ट्रम्प यांचे खाते प्रथम निलंबित करण्यात आले होते. फेसबुकचे उपाध्यक्ष (ग्लोबल अफेयर्स) निक क्लेग यांनी शुक्रवारी एका ब्लॉग पोस्टद्वारे ही माहिती दिली.

फेसबुकच्या म्हणण्यानुसार ट्रम्प 7 जानेवारी 2023 पर्यंत आपल्या फेसबुक अकाउंटवर प्रवेश करू शकणार नाहीत. म्हणजेच नोव्हेंबर 2022 मध्ये होणार्‍या मध्यावधी निवडणुकांमध्येही त्यांना फेसबुकपासून दूर राहावे लागेल.

ट्रम्प म्हणाले- हा आमच्या मतदारांचा अपमान

ट्रम्प यांनी 2020च्या निवडणुकीत मतदान करणाऱ्या 75 दशलक्ष लोकांचा फेसबुकने अपमान केल्याचे म्हटले आहे. ट्रम्प यांनी म्हटलं की, त्या लोकांना सेन्सॉर करून, गप्प करून बाहेर केले जाऊ शकत नाही. आमही पुन्हा जिंकू. आपला देश हा अपमान यापुढे सहन करू शकत नाही.

तज्ज्ञांशी बोलल्यानंतर जनतेला कोणताही धोका होऊ नये म्हणून ट्रम्प यांचे खाते कधी सक्रिय करायचे याचा निर्णय घेतला जाईल, असे फेसबुकने म्हटले आहे. यासाठी हिंसाचार आणि शांततेचा भंग करणाऱ्या घटनांचा विचार केला जाईल.

ट्विटरची ट्रम्पवर कायमची बंदी

अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या निकालानंतर 6 जानेवारीला अमेरिकन संसदेत कॅपिटल हिलच्या बाहेर हिंसाचार वाढला होता. यादरम्यान ट्रम्प यांच्यावर समर्थकांना चिथावणी देण्याचा आरोप होता. यामुळे दुसर्‍या दिवशी म्हणजेच 7 जानेवारी रोजी फेसबुकसह इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्रम्पविरोधात कारवाई झाली. फेसबुकची कंपनी इन्स्टाग्राम आणि गुगलच्या प्लॅटफॉर्म यूट्यूबने ट्रम्प यांचे खाते निलंबित केले होते. दुसरीकडे ट्विटरने ट्रम्प यांच्यावर कायमची बंदी घातली आहे.

जानेवारीत सोशल मीडिया कंपन्यांनी कारवाई केल्यानंतरही ट्रम्प यांचा प्रतिसाद आला. पुढच्या वेळी ते सोशल मीडिया कंपन्यांच्या सीईओंना डिनरला आमंत्रित करणार नसल्याचे त्यांनी म्हटले होते. ट्रम्प म्हणाले होते की, यापुढे फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग आणि त्यांच्या पत्नीसमवेत व्हाइट हाऊसमध्ये डिनर होणार नाही. ते फक्त व्यवसायाबद्दल बोलतील. यानंतर झुकरबर्गने एका पोस्टमध्ये म्हटले की, यावेळी अध्यक्षांना आमच्या सेवा वापरण्याची परवानगी देणे हा खूप मोठा धोका आहे.

facebook suspended former us president donald trumps accounts for two years

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात