ट्विटरचा यू-टर्न : सरसंघचालकांसह अनेक नेत्यांच्या खात्यावर ब्लू टिक पुन्हा बहाल, फॉलोअर्सही वाढले

After Big Oppose Twitter U-Turn, Blue tick back on the account of many leaders including Mohan Bhagwat

Twitter U-Turn : देशभरातून मोठ्या विरोधानंतर ट्विटरने सरसंघचालक मोहन भागवत तसेच अरुण कुमार, सुरेश जोशी आणि कृष्णा गोपाळ यांच्या खात्यांवर ब्लू टिक पुन्हा रिस्टोर केली आहे. तत्पूर्वी, शनिवारी सकाळी ट्विटरने मोठी अॅक्शन घेत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह अनेक नेत्यांच्या वैयक्तिक ट्विटर हँडलवरील ब्लू टिक काढून टाकले होते. मात्र, या निर्णयावरून गोंधळ उडाल्यानंतर ट्विटरने पुन्हा उपराष्ट्रपतींच्या ट्विटर हँडलवर ब्लू टिक बहाल केली होती. After Big Oppose Twitter U-Turn, Blue tick back on the account of many leaders including Mohan Bhagwat


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशभरातून मोठ्या विरोधानंतर ट्विटरने सरसंघचालक मोहन भागवत तसेच अरुण कुमार, सुरेश जोशी आणि कृष्णा गोपाळ यांच्या खात्यांवर ब्लू टिक पुन्हा रिस्टोर केली आहे. तत्पूर्वी, शनिवारी सकाळी ट्विटरने मोठी अॅक्शन घेत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह अनेक नेत्यांच्या वैयक्तिक ट्विटर हँडलवरील ब्लू टिक काढून टाकले होते. मात्र, या निर्णयावरून गोंधळ उडाल्यानंतर ट्विटरने पुन्हा उपराष्ट्रपतींच्या ट्विटर हँडलवर ब्लू टिक बहाल केली होती.

फॉलोअर्सची संख्या वाढली

खास बाब म्हणजे ब्ल्यू टिक हटवून परत येईपर्यंत या वादानंतर या नेत्यांना फालो करणार्‍यांची संख्या वाढत असल्याचे दिसून आले आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या फॉलोअर्सच्या संख्येविषयी सांगायचे झाल्यास ब्लू टिक हटविले तेव्हा ते 207.9K होते, ब्लू टिक परत येईपर्यंत ते 214.3K झाले. अशाप्रकारे सरसंघचालकांना फॉलो करणाऱ्यांच्या संख्येत सुमारे सहा लाख 40 हजारांनी वाढ झाली. व्यंकय्या नायडूंच्या बाबतीतही असेच दिसून आले.

ट्विटरवरून ब्लू टिक हटणे म्हणजे कंपनीने ते खाते असत्यापित केले आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह अनेक नेत्यांच्या ट्विटर हँडलवरून ब्लू टिक हटवण्यात आला होता. असे मानले जाते की, मोहन भागवत यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून एकही ट्विट केलेले नाही, त्यामुळे ब्लू टिक त्यांच्या हँडलवरून काढण्यात आली होती.

ट्विटर का काढते ब्लू टिक?

खरे तर ट्विटरच्या नियमांनुसार, खाते सक्रिय ठेवण्यासाठी दर सहा महिन्यांनी लॉग इन करणे आणि प्रोफाइल अपडेट करणे आवश्यक आहे. त्याच वेळी व्यंकय्या नायडू यांच्या ट्विटर अकाउंटवरून ब्लू टिक काढून टाकल्यानंतर नायडू यांचे ट्विटर हँडल गेल्या सहा महिन्यांत लॉग इन झाले नसल्याचे ट्विटरद्वारे स्पष्ट करण्यात आले होते.

ट्विटरने मानले सरकारचे नियम

भारत सरकारच्या सोशल मीडियासंदर्भातील अनेक नवीन मार्गदर्शक तत्त्वांना स्वीकारण्यास ट्विटरने सहमती दर्शविली आहे. अलीकडेच ट्विटरने दिल्ली उच्च न्यायालयात म्हटले की त्यांनी माहिती तंत्रज्ञान (इंटरमीडिएट दिशानिर्देश आणि डिजिटल मीडिया आचारसंहिता) नियम, २०२० चे पालन केले आहे आणि 28 मे रोजीच त्यांनी तक्रार अधिकारी नेमले आहेत.

After Big Oppose Twitter U-Turn, Blue tick back on the account of many leaders including Mohan Bhagwat

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात