चिंताजनक : जगात वुहानसारख्या 59 प्रयोगशाळा, विषाणू लीक होण्याच्या दुर्घटनांचा धोका वाढला

59 laboratories like Wuhan in the world, increasing risk of accidents like virus spread

virus spread : पाश्चिमात्य देशांमध्ये हा मुद्दा सध्या जोरात चर्चिला जात आहे की, कोरोना विषाणू चीनमधील वुहानमधील प्रयोगशाळेतूनच लीक झाला आणि जगभरात पसरला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी आपल्या देशाच्या गुप्तचर यंत्रणांना 90 दिवसांच्या आत यासंदर्भात चौकशी अहवाल देण्यास सांगितले आहे. 59 laboratories like Wuhan in the world, increasing risk of accidents like virus spread


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पाश्चिमात्य देशांमध्ये हा मुद्दा सध्या जोरात चर्चिला जात आहे की, कोरोना विषाणू चीनमधील वुहानमधील प्रयोगशाळेतूनच लीक झाला आणि जगभरात पसरला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी आपल्या देशाच्या गुप्तचर यंत्रणांना 90 दिवसांच्या आत यासंदर्भात चौकशी अहवाल देण्यास सांगितले आहे. परंतु शास्त्रज्ञांची एक बाजू असे म्हणते की, विषाणूविषयी संशोधन जगभरात सुरू आहे. तिथेही अपघात होतच असतात. तर जरी वुहानमध्ये असे घडले असेल तर ते फक्त अपघातासारखेच मानले पाहिजे.

प्रसिद्ध ब्रिटिश वृत्तपत्र फायनान्शियल टाइम्सने शुक्रवारी एक वृत्त प्रकाशित केले, ज्यामध्ये असे म्हटले आहे की, जगात अशा किमान 59 प्रयोगशाळा अस्तित्वात आहेत किंवा तयार केल्या आहेत. तेथे धोकादायक जैविक संशोधन होत आहे किंवा भविष्यात केले जाईल. या वृत्तानुसार गेल्या दशकात अशा प्रयोगशाळांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या किंवा बनविल्या गेलेल्या प्रयोगशाळा ब्रिटन, अमेरिका, चीन, भारत, गेबॉन आणि आयव्हरी कोस्ट या 23 देशांमध्ये आहेत. वुहानची प्रयोगशाळादेखील या 59 प्रयोगशाळांपैकी एक आहे.

या प्रयोगशाळांचा अभ्यास जॉर्ज मेसन युनिव्हर्सिटीच्या बायोडिफेंसचे प्रोफेसर ग्रेगरी कोबलेन्त्झ आणि लंडनमधील किंग्ज कॉलेजमधील प्रोफेसर फिलिपा लेंटोज यांनी केला आहे. त्यांच्या मते, ज्या 42 प्रयोगशाळांसाठी डेटा उपलब्ध आहे, त्यापैकी निम्म्या प्रयोगशाळा गेल्या दशकात तयार केल्या आहेत.

लेंट्झ म्हणाले- ‘जितकी जास्त अशी कामे होतील तितके अधिक अपघातही होतील.’ अमेरिकेतील रुटगर्स युनिव्हर्सिटीच्या केमिकल बायोलॉजीचे प्रोफेसर रिचर्ड एब्राईट यांनी फायनान्शियल टाइम्सला सांगितले की, ‘जेवढ्या जास्त संस्था असतील आणि तितके जास्त लोक त्या धोकादायक जीवाणू-विषाणूंच्या संपर्कात येतील.

विश्लेषकांचे म्हणणे आहे की, वुहान प्रयोगशाळेच्या तपासणीतून निष्कर्ष काढले गेले तरी कोरोना साथीने जगाचे लक्ष व्हायरस संशोधनावर केंद्रित केले आहे हे स्पष्ट आहे. आतापर्यंत अशा संशोधनावर आंतरराष्ट्रीय देखरेखीची कोणतीही व्यवस्था नाही. काही काळापूर्वी, न्यूयॉर्क मॅगझिन या अमेरिकन मासिकात प्रदीर्घ विश्लेषणात असे म्हटले गेले होते की, वुहानमधील संसर्ग प्रयोगशाळेतून पसरण्याची दाट शक्यता आहे. अशा घटना जगातील इतर विषाणूंशी संबंधित प्रयोगशाळांमध्येही घडल्या आहेत.

59 laboratories like Wuhan in the world, increasing risk of accidents like virus spread

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात