कमलनाथ यांच्याकडून आपल्या वक्तव्याचे निर्लज्ज समर्थन; ‘भारत महान’ असे गौरवाने म्हणता येत नाही!

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते कमलनाथ यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्याचे निर्लज्ज समर्थन केले आहे. माझा भारत महान नाही, भारत बदनाम आहे. सर्वच देशांनी भारतीयांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे, असे म्हटल्यावर कमलनाथ यांच्यावर सर्व बाजुंनी टीका होत आहे. तरीही ते पुन्हा म्हणाले की भारत महान आहे हे मी गौरवाने म्हणू शकत नाही. कारण आता परिस्थिती बदलली आहे.From Kamal Nath’s statement, it is not possible to proudly say that India is great


विशेष प्रतिनिधी

भोपाळ : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते कमलनाथ यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्याचे निर्लज्ज समर्थन केले आहे. माझा भारत महान नाही, भारत बदनाम आहे. सर्वच देशांनी भारतीयांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे,

असे म्हटल्यावर कमलनाथ यांच्यावर सर्व बाजुंनी टीका होत आहे. तरीही ते पुन्हा म्हणाले की भारत महान आहे हे मी गौरवाने म्हणू शकत नाही. कारण आता परिस्थिती बदलली आहे.



कमलनाथ म्हणाले, नरेंद्र मोदींचे सरकार कोरोनाने बळी पडलेल्यांचा खरा आकडा का जाहीर करत नाही. मी त्यांना माहिती मागितली की ते गुन्हा दाखल करतात. भारत महान आहे हे म्हणणे गौरवाचे होते परंतु आता परिस्थिती बदलली आहे, असे म्हटल्यावर मला राष्ट्रद्रोही म्हणतात.

कोरोनाने बळी पडलेल्यांचे रेकॉर्ड उपलब्ध आहे. मात्र, मी त्याबाबतची माहिती विचारल्यावर राजकारण करतोय असा आरोप केला जात आहे. मी जेव्हा लसीकरणाविषयी प्रश्न विचारतो आणि त्याबाबतची माहिती मागतो त्यामध्ये चुकीचे काय आहे?

मी मृत्यूचे राजकारण करतोय असा आरोप ते करत आहे. मात्र, ही टीका नाही तर सत्य आहे.’इंडियन करोना’ वरील वादग्रस्त वक्तव्यावरून आधीच कमलनाथ यांच्यावर टीका झाली होती. आता त्यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलं. माझा भारत महान नव्हे, तर भारत बदनाम आहे.

सर्वच देशांनी भारतीयांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. तसंच न्यूयॉर्कमध्ये जे भारतीय टॅक्सी चालक आहेत त्यांच्या टॅक्सीत कुणीही बसत नाही असं आपल्याला फोनवर काहींनी सांगितलं, असं कमलनाथ म्हणाले.

कमलनाथ यांनी केलेल्या टीकेला भाजपचे सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांनी प्रत्युत्तर दिलं. माझा भारत महान होता, आहे आणि राहणार. पण चिनी विचार आणि इटिलियन चष्म्यांना पाहणाºयांना तो दिसणार नाही.

From Kamal Nath’s statement, it is not possible to proudly say that India is great

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात