कोरोनामुळे कर्ता सदस्य गमाविलेल्या कुटुंबांसोबत सरकार, पंतप्रधानांनी दिला विश्वास, निवृत्तीवेतन तसेच विमा भरपाई मिळणार


कोरोनाच्या उद्रेकात अनेक कुटुंबे उध्दस्त झाली. घरातील कर्त्या सदस्यांचा मृत्यू झाल्यामुळे अनेक कुटुंबांपुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे. सरकार त्यांच्यासोबत असल्याचा विश्वास देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कुटुंबांना निवृत्तीवेतन तसेच विमा भरपाई देण्याची घोषण केली आहे.The government, along with the families who lost members due to Corona, will get the trust, pension and insurance compensation given by the Prime Minister.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोनाच्या उद्रेकात अनेक कुटुंबे उध्दस्त झाली. घरातील कर्त्या सदस्यांचा मृत्यू झाल्यामुळे अनेक कुटुंबांपुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे. सरकार त्यांच्यासोबत असल्याचा विश्वास देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कुटुंबांना निवृत्तीवेतन तसेच विमा भरपाई देण्याची घोषण केली आहे.

पीएम केअर्स फॉर चिल्ड्रेन अंतर्गत घोषित केलेल्या उपाययोजनांव्यतिरिक्त – कोविड बाधित मुलांचे सक्षमीकरण, कोविडमुळे कर्ता सदस्य गमावलेल्या कुटुंबांना मदत करण्यासाठी सरकारने आणखी उपाययोजना जाहीर केल्या आहेत.



त्याद्वारे ते कोविड मुळे मरण पावलेल्यांच्या कुटुंबांना निवृत्तीवेतन तसेच वाढीव आणि व्यापक विमा भरपाई देतील.पंतप्रधान म्हणाले की सरकार या कुटुंबियांसोबत एकजुटीने उभे आहे.

या योजनांच्या माध्यमातून त्यांना भेडसावणाऱ्या आर्थिक अडचणी कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.कुटुंबास सन्मानाचे जीवन जगण्यासाठी आणि चांगले जीवनमान कायम ठेवण्यासाठी, रोजगाराशी संबंधित मृत्यू प्रकरणांसाठी असलेला ईएसआयसी निवृत्तीवेतन योजनेचा लाभ कोविडमुळे मरण पावलेल्यांनाही देण्यात येत आहे.

अशा व्यक्तींवर अवलंबून असलेल्या कुटुंबातील सदस्य विद्यमान नियमांनुसार कर्मचाऱ्यांच्या सरासरी दैनंदिन वेतनाच्या 90 टक्के इतका निवृत्तीवेतनाचा लाभ मिळणार आहे. हा लाभ 24 मार्च २०२० पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू असेल.

ईडीएलआय योजनेतील विमा लाभात वाढ करून त्याची व्याप्ती ही वाढवली आहे. इतर सर्व लाभार्थ्यांव्यतिरिक्त कोरोनामुळे आपला जीव गमावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटूंबास मदत करेल. विम्याचा कमाल लाभ 6 लाख रुपयांवरून 7 लाख रुपये करण्यात आला आहे.

2.5 लाख रुपयांच्या किमान विमा लाभाची तरतूद पुनर्संचयित केली गेली आहे आणि 15 फेब्रुवारी 2020 पासून पुढील तीन वर्षांसाठी पूर्वलक्षी प्रभावाने लागू असेल.कंत्राटी / हंगामी कर्मचाºयांच्या कुटुंबियांना लाभ देण्यासाठी

केवळ एका आस्थापनेमध्ये कायम नोकरीची अट शिथिल केली गेली आहे. मृत्यूपूर्वी 12 महिन्यांत नोकरी बदललेल्या अशा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना लाभ देण्यात आला आहे.

The government, along with the families who lost members due to Corona, will get the trust, pension and insurance compensation given by the Prime Minister.

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात