कोरोना काळात कैद्यांची गर्दी होणार कमी, राज्यात कारागृहांमधील ५४२ कैद्यांना तात्काळ पॅरोल


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यातील कारागृहांमध्ये असलेल्या ५४२ कैद्यांना तात्काळ पॅरोल वा जामीन देण्यात आला आहे. कोरोना काळात कैद्यांची गर्दी कमी करण्यासाठी स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीच्या शिफारशीनंतर कैद्यांना पॅरोल देण्यात आला आहे.542 peoples gets parol from jain adue to coron

गेल्या वर्षी राज्यभरातील कारागृहांमधून १० हजार कैद्यांची पॅरोल वा जामिनावर सुटका करण्यात आली होती. त्यानंतरही राज्यातील कारागृहांमध्ये कैद्यांची संख्या अधिक आहे. सुमारे १२ हजार कैद्यांचे जामीन अर्ज प्रलंबित आहेत.२६ मेपर्यंत ४८३ कैद्यांची जामिनावर, तर ५९ कैद्यांची पॅरोलवर सुटका करण्यात आली. उच्चस्तरीय समितीने १ मे आणि ७ मे रोजी याबाबत शिफारस केली होती. राज्यातील ४६ कारागृहांमध्ये २४ हजार कैदी ठेवण्याची क्षमता आहे.

प्रत्यक्षात त्यात ३२ हजार ३६२ कैदी आहेत. म्हणजे अद्यापही राज्यातील विविध कारागृहांमध्ये १० हजार ८०० कैदी अधिक आहेत. गेल्या वर्षी मार्च महिन्यात हीच संख्या ३६ हजार ६१ एवढी होती. कोरोनाच्या पहिल्या लाटेत मोठ्या प्रमाणात कैद्यांना पॅरोल आणि जामिनावर सोडण्यात आले होते.

त्यानंतर संख्या जुलै २०२० मध्ये २६ हजारांपर्यंत कमी झाली होती; परंतु यंदा ११ मेपर्यंत राज्यातील कैद्यांची संख्या ३४ हजार ७३३ वर पोहोचली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सहा कैद्यांचा मृत्यू झाला.

542 peoples gets parol from jain adue to coron

महत्त्वाच्या बातम्या

 

 

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण