कमलनाथ बरळले, भारत महान नाही बदनाम, शिवराजसिंह चौहान म्हणाले मानसिक स्वास्थ्य बिघडले


मोदीद्वेषातून भारतालाच बदनाम करण्यापर्यंत कॉँग्रेसच्या नेत्यांची मजल गेली आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ त्यावर कडी करत बरळले की भारत महान नाही बदनाम आहे. त्यावर कमलनाथ यांचे स्वास्थ्य बिघडले आहे असे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले आहे.Kamal Nath said India is not great, notoriety, Shivraj Singh Chouhan said mental health deteriorated


विशेष प्रतिनिधी

भोपाळ : मोदीद्वेषातून भारतालाच बदनाम करण्यापर्यंत कॉँग्रेसच्या नेत्यांची मजल गेली आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ त्यावर कडी करत बरळले की भारत महान नाही बदनाम आहे.

त्यावर कमलनाथ यांचे स्वास्थ्य बिघडले आहे असे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले आहे.पत्रकार परिषदेत बोलताना कमलनाथ यांची जीभ घसरली. ते म्हणाले, भारतीय लोकांना सगळ्या देशांनी प्रवेशबंदी केली आहे.



भारत महान नाही तर बदनाम आहे. उज्जैनमधील एकाने आपल्याला फोन करून सांगितले की अमेरिकेत टॅक्सी चालविणाºया भारतीयांनाही त्याचा फटका बसला आहे. त्यांच्या टॅक्सीमध्ये कोणी बसायला तयार नाही. मोदींनी देशाची ही अवस्था केली आहे.

यावर शिवराज सिंह चौहान म्हणाले की मी कॉँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना विचारू इच्छितो की त्या कमलनाथ यांच्या विधानाशी सहमत आहेत का? भारत एक प्राचीन आणि महान देश आहे.

त्यामुळे भारताची बदनामी करणाऱ्या कमलनाथ यांना पक्षातून काढून टाकायला हवे. सोनिया गांधी यांनी त्यांच्यावर कारवाई करायला हवी. सत्ता गेल्यावर कमलनाथ यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले आहे.यापूर्वीही कमलनाथ यांनी भारताविरुध्द वक्तव्ये केली आहेत.

कोरोनाचा उगम जरी चीनमध्ये झालेला असला तरी आता तो भारतीय व्हेरिएंट बनला आहे. आपले शास्त्रज्ञही कोरोनाचा भारतीय व्हेरिएंट असल्याचे मान्य करत आहेत. परंतु, केवळ भाजपाचे लोक हे मान्य करत नाही. कमलनाथ यांच्या या वक्तव्यावरून त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

Kamal Nath said India is not great, notoriety, Shivraj Singh Chouhan said mental health deteriorated

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात