जगातील सर्वात श्रीमंत बनले बर्नार्ड, अमेझॉनच्या जेफ बेझोस यांची दुसऱ्या क्रमांकावर घसरण

bernard arnault becomes worlds biggest billionaire jeff bezos slips to second in forbes

Bernard Arnault Becomes Worlds Biggest Billionaire : जगातील अब्जाधीशांच्या यादीत आता बर्नार्ड अर्नाल्ट पहिल्या क्रमांकावर पोहोचले आहेत. श्रीमंतांच्या यादीत प्रथम स्थान पटकावताना त्यांनी अ‍मेझॉनचे मालक जेफ बेझोस यांना मागे टाकले. त्याचवेळी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात भाववाढीमुळे मुकेश अंबानींच्या संपत्तीत 2.9 अब्ज डॉलर्सने वाढ झाली आहे. यासह ते आता 77.5 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह 12व्या क्रमांकावर गेले आहेत. bernard arnault becomes worlds biggest billionaire jeff bezos slips to second in forbes


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : जगातील अब्जाधीशांच्या यादीत आता बर्नार्ड अर्नाल्ट पहिल्या क्रमांकावर पोहोचले आहेत. श्रीमंतांच्या यादीत प्रथम स्थान पटकावताना त्यांनी अ‍मेझॉनचे मालक जेफ बेझोस यांना मागे टाकले. त्याचवेळी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात भाववाढीमुळे मुकेश अंबानींच्या संपत्तीत 2.9 अब्ज डॉलर्सने वाढ झाली आहे. यासह ते आता 77.5 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह 12व्या क्रमांकावर गेले आहेत.

फोर्ब्स रिअल टाइम अब्जाधीश यादीनुसार शुक्रवारी सकाळी 10.35 वाजता बर्नाड अर्नाल्ट आता 191 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह फोर्ब्सच्या सर्वात श्रीमंतांच्या यादीत प्रथम क्रमांकावर आहेत, तर जेफ बेझोस हे 187.4 अब्ज डॉलर्स संपत्तीसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. म्हणजेच या दोघांमधील अंतर आता जवळपास 4 अब्ज डॉलर्स झाले आहे. टेस्लाचे एलन मस्क सध्या 157.5 अब्ज डॉलर्ससह तिसर्‍या क्रमांकावर आहेत. मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स 126.6 अब्ज डॉलर्ससह चौथ्या क्रमांकावर आहेत. फेसबुकचे मार्क झुकरबर्ग 120.6 अब्ज डॉलर्ससह पाचव्या स्थानावर आहेत.

सोमवारी फॅशन जगातील सर्वात मोठा समूह असलेल्या एलव्हीएमएचचे मालक बर्नाड अर्नाल्ट यांनी जेफ बेझोसकडून अव्वल क्रमांकाचा किताब हिसकावला.

फोर्ब्सची रिअल-टाइम अब्जाधीश रँकिंग सार्वजनिक होल्डिंगमधील दररोजच्या चढ-उतारांबद्दल माहिती प्रदान करते. जगातील विविध भागांमध्ये स्टॉक मार्केट उघडल्यानंतर प्रत्येक 5 मिनिटानंतर ही यादी अपडेट केली जाते. खासगी कंपनीची मालमत्ता असणार्‍या व्यक्तींचे नेटवर्थ दिवसातून एकदा अद्ययावत केली जाते.

bernard arnault becomes worlds biggest billionaire jeff bezos slips to second in forbes

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण