संयुक्त राष्ट्र महासभेच्या अध्यक्षांचे काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानला समर्थन, म्हणाले- हा तर पॅलेस्टाइनसारखा मुद्दा

President of United Nations General Assembly in favor of Pakistan on Kashmir, says its like palestine issue

Pakistan on Kashmir : संयुक्त राष्ट्र महासभेचे अध्यक्ष वोल्कन बोजकीर यांनी काश्मीरवर पाकिस्तानच्या समर्थनार्थ मोठे वक्तव्य केले आहे. काश्मीरविषयी त्यांनी वादग्रस्त विधान केले असून त्याबाबत पाकिस्तानचे नेते खूप उत्साही झाले आहेत. व्होल्कन बोजकीर यांनी काश्मीरची तुलना पॅलेस्टाईनशी करताना म्हटले की, काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर पाकिस्तानने अधिक दृढपणे उभा करावा. President of United Nations General Assembly in favor of Pakistan on Kashmir, says its like palestine issue


विशेष प्रतिनिधी

इस्लामाबाद : संयुक्त राष्ट्र महासभेचे अध्यक्ष वोल्कन बोजकीर यांनी काश्मीरवर पाकिस्तानच्या समर्थनार्थ मोठे वक्तव्य केले आहे. काश्मीरविषयी त्यांनी वादग्रस्त विधान केले असून त्याबाबत पाकिस्तानचे नेते खूप उत्साही झाले आहेत. व्होल्कन बोजकीर यांनी काश्मीरची तुलना पॅलेस्टाईनशी करताना म्हटले की, काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर पाकिस्तानने अधिक दृढपणे उभा करावा.

पॅलेस्टाइनशी काश्मीरची तुलना

पाकिस्तान दौर्‍यावर आलेले संयुक्त राष्ट्र महासभेचे अध्यक्ष वोल्कन बोजकीर यांनी इस्लामाबादमध्ये काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानच्या बाजूने मोठे वक्तव्य केले आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांच्यासमवेत पत्रकार परिषदेत व्होल्कन बोजकीर यांनी काश्मीरची तुलना पॅलेस्टाईनशी केली आणि ते म्हणाले की, काश्मीरचा मुद्दा पाकिस्तानने संयुक्त राष्ट्राच्या व्यासपीठावर ठामपणे उठवावा. वोल्कन बोजकिर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ‘काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर जोमाने ठेवण्याचे पाकिस्तानचे विशेष कर्तव्य आहे, असा माझा विश्वास आहे आणि काश्मीर आणि पॅलेस्टाईनचा मुद्दा एकच आहे यावर मी सहमत आहे.’ तत्पूर्वी, पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी पत्रकार परिषदेत काश्मीर प्रश्नावर संयुक्त राष्ट्र संघाने हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती.

सिमला कराराचा मुद्दा उपस्थित केला

‘ट्रायब्यून’ या पाकिस्तानी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, वोल्कन बोजकीर म्हणाले की, ‘मी नेहमीच असे म्हटले आहे की जम्मू-काश्मीर आणि भारतामधील परिस्थिती बदलणे दोन्ही बाजूंनी टाळले पाहिजे आणि पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रांच्या सनदी अंतर्गत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा ठराव देण्यात यावा. सिमला करारानुसार शांततेचा तोडगा निघाला पाहिजे. असे मानले जात आहे की, व्हॉल्कन बोजकीर काश्मीरमधून भारत सरकारने काढलेल्या कलम 370 आणि 35 एचा संदर्भ देत होते. 5 ऑगस्ट 2019 रोजी भारत सरकारने जम्मू-काश्मीरमधून बहुमत प्रस्तावाद्वारे कलम 370 काढून एक ठराव संमत केला. त्याअंतर्गत जम्मू-काश्मीरला दोन केंद्रशासित प्रदेशांत विभागण्यात आले आणि लडाखला स्वतंत्र केंद्र शासित प्रदेश बनविण्यात आले.

President of United Nations General Assembly in favor of Pakistan on Kashmir, says its like palestine issue

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात