दोन शाळांतील विद्यार्थ्यांच्या भांडणातून दिल्लीत चार विद्यार्थ्यांना चाकूने भोसकले


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील मयूर विहार फेज २ मधील एका शाळेबाहेर दहावीत शिकणाऱ्या चार विद्यार्थ्यांवर चाकूने ११ डिसेंबर रोजी हल्ला करण्यात आला. Four students studying in Class 10 were attacked with a knife outside a school in Delhi

दिल्ली पोलिसांनी माहिती दिली की, दुसऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांसोबत झालेल्या भांडणानंतर चार विद्यार्थ्यांवर कथितरित्या हल्ला करण्यात आला.
चारपैकी तीन जणांना किरकोळ दुखापत झाली आहे, तर एका विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, परंतु तो आता धोक्याबाहेर आहे, असे दिल्ली पोलिसांनी सांगितले.वायू प्रदूषणामुळे दिल्लीतील शाळा २ डिसेंबरपासून बंद केल्या आहेत. सरकारने २९ नोव्हेंबर रोजी शाळा पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले तरी, प्रदूषणाची पातळी कमी झाली नसतानाही वर्ग पुन्हा सुरू केले. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सरकारवर ताशेरे ओढले. त्यामुळे २ डिसेंबर रोजी दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी पुढील आदेश येईपर्यंत दिल्लीतील सर्व शाळा बंद ठेवण्याची घोषणा केली. गेल्या वर्षी मार्चपासून दिल्लीतील शाळा चार वेगवेगळ्या वेळा बंद करण्यात आल्या आहेत.

Four students studying in Class 10 were attacked with a knife outside a school in Delhi

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण