ईशनिंदेच्या आरोपावरून पाकिस्तानमध्ये परदेशी नागरिकाला जीवंत जाळले


विशेष प्रतिनिधी

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील सियालकोटमध्ये ‘ईशनिंदे’च्या आरोपावरून एका परदेशी नागरिकाची जमावाकडून मारहाण करत क्रूर हत्या करण्यात आली. बेदम मारहाणीनंतरही जमावाचा राग इथेच शांत झाला नाही. त्यांनी परदेशी नागरिकाला रस्त्यावर जिवंत पेटवून दिले.Foreign national burnt alive in Pakistan for blasphemy

सियालकोट पोलीस अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती श्रीलंकन नागरिक आहे. प्रियानाथ कुमारा असे या व्यक्तीचं नाव होतं. सियालकोटच्या वजिराबाद रोड स्थित एका खासगी कारखान्यात एक्सपोर्ट मॅनेजर पदावर ते कार्यरत होते.



प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कारखान्यात सकाळपासून प्रियानाथ यांनी ईशनिंदा केल्याच्या अफवा सुरू होत्या. अत्यंत तेजीनं ही अफवा संपूर्ण कारखान्यात पसरली. याचा निषेध म्हणून कर्मचा
सकाळी ११.३५ वाजता पाकिस्तान रेस्क्यू सर्व्हिस ११२२ अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती मिळेपर्यंत आणि ते घटनास्थळी दाखल होईपर्यंत पीडिताला बेदम मारहाण करण्यात आली होती.

पोलीसांची संख्या कमी असल्याने समोरची संतापलेली गर्दी मोठ्या संख्येत असल्यानं मृताच्या मदतीला जाणं किंवा हस्तक्षेप करणं संभव नव्हतं, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.जमावाने मारहाण करत प्रियानाथ यांना रस्त्यावर आणले आणि जीवंतच पेटवून दिले. यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. मृतदेह पेटवून देण्यापूर्वीच पीडिताचा मृत्यू झाला असावा अशी शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली.

पोलिसांनी पीडिताला वाचवण्यासाठी प्रयत्न केला परंतु, गर्दीसमोर तो अयशस्वी ठरला. जवळपास दुपारी १२.३० वाजता पोलीस जळालेला मृतदेह घेऊन रुग्णालयात पोहचले. सियालकोट रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीचा मृतदेह गंभीररित्या जळालेल्या अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आला होता. शरीराचे जवळपास राखेत रुपांत झालं होतं.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान म्हणाले, सियालकोटच्या कारखान्यात झालेला हल्ला आणि श्रीलंकन मॅनेजरला जिवंत जाळलं जाणं पाकिस्तानसाठी लाजिरवाणा दिवस आहे. मी स्वत: या घटनेच्या चौकशीवर लक्ष ठेवून आहे.

या घटनेसाठी जबाबदार असणाऱ्या व्यक्तींना शिक्षा दिली जाईल. या प्रकरणी अटकही करण्यात येत आहेत.सोशल मीडियावरही या घटनेचे अनेक व्हिडिओ शेअर केले जात आहेत. सियालकोट जिल्हा पोलीस अधिकारी उमर सईद मलिक यांनी या घटनेचा अधिक तपास सुरू असल्याचं म्हटलंय.

Foreign national burnt alive in Pakistan for blasphemy

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात