विशेष प्रतिनिधी
रायगड : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शिवप्रेमींच्या मागणीचा मान राखत हेलिकॉप्टरऐवजी रोप वे ने रायगडावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमुळे धूळ आणि कचरा उडू नये यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे.The President will keep the respect of Shivpremis, will avoid going by helicopter so that dust does not fly on the statue of Maharaj
राष्ट्रपती आता रोपवेने किल्ले रायगडावर जाणार असल्याची माहिती भाजपचे राज्यसभेचे खासदार संभाजी राजे यांनी दिली. महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे शिवदर्शनासाठी 6 डिसेंबर रोजी किल्ले रायगडावर येत आहेत. मागील अनेक दिवसांपासून प्रशासनाची तयारी सुरू आहे.
किल्ले रायगडावर हेलिकॉप्टर उतरल्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेवर धुरळा व कचरा उडणार असल्याने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी हॅलीकॉप्टर गडावर उतरवू नये अशी मागणी कोकण कडा मित्र मंडळ व तमाम शिवप्रेमी यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली होती.
शिवप्रेमींचा विरोध व त्यांच्या भावना लक्षात घेऊन राष्ट्रपती हे किल्ले रायगडावर न उतरता रोपवे ने गडावर जाणार असल्याची माहिती खासदार संभाजीराजे यांनी दिली आहे. शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत दुर्गराज रायगडावर येण्याची इच्छा राष्ट्रपतींनी व्यक्त केली आहे. यासाठी शिवभक्तांच्या भावनेचा आदर राखत ते गडावर रोपवेने येणार आहेत. राष्ट्रपती महोदयांच्या या शिवभक्तीस सॅल्युट करतो, असे संभाजी राजे म्हणाले.
25 वर्षांपूर्वी शिवप्रेमींनी आमरण उपोषण करून गडावरील हेलिपॅड उखडून फेकून दिले होते. आता राष्ट्रपतींच्या या भूमिकेने गडावर कधीच हेलिकॉप्टर उतरणार नाही हे स्पष्ट झाले आहे. पूर्वी किल्ले रायगडावरील होळीच्या माळावर हॅलिपॅड होते. या ठिकाणी हॅलिकॉप्टर उतरताना अगर उड्डाण घेताना मोठ्या प्रमाणात धुळ, माती, केर कचरा उडतो.
ही धुळ, माती होळीच्या माळावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर उडत असल्याने 1996 ला येथे उपोषण करून हा हॅलिपॅड येथून काढून टाकण्यात आला होता. सुमारे 25 वर्षांनंतर शिवरायांच्या अवमानाचा तोच प्रश्न पुन्हा निर्माण होत असल्याने शिवप्रेमींकडून विरोध झाला होता.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App