नितीश कुमारापाठोपाठ आठवले यांनी भाजपला दिला उत्तर प्रदेशात आघाडी करून निवडणूक लढविण्याचा सल्ला


वृत्तसंस्था

गोरखपूर : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाने उत्तर प्रदेशात भाजपकडे आघाडीचा प्रस्ताव दिल्यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील भाजपला रिपब्लिकन पार्टीशी आघाडी करून निवडणूक लढवण्याचा सल्ला दिला आहे. रिपब्लिकन पार्टीला भाजपने 10 ते 12 जागा सोडाव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे. ही मागणी भाजपने पूर्ण केली तर मायावतींच्या बहुजन समाज पक्षाला त्याचा मोठा फटका बसेल असा दावाही आठवले यांनी केला आहे. Following Nitish Kumar, Athavale advised the BJP to take the lead in Uttar Pradesh and contest the elections

देशात जातीय जनगणना करावी असे मत त्यांनी व्यक्त केले होते. त्याचा पुनरुच्चारही त्यांनी आपल्या उत्तर प्रदेश दौऱ्यात केला आहे. उत्तर प्रदेशात जेडीयू आणि आठवले यांचे रिपब्लिकन पार्टी यांचे राजकीय अस्तित्व नाही. तरी देखील राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीएचे घटक असल्याने त्यांनी भाजपला उत्तर प्रदेशात आघाडी करण्याचा सल्ला दिला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटून हा प्रस्ताव दिल्याचे आठवले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.या दोन्ही पक्षांची भाजपला उत्तर प्रदेशात कोणत्याही प्रकारची राजकीय गरजही नाही. कारण त्यांची ताकद तर सोडाच त्यांचे राज्यात त्यांचे राजकीय अस्तित्वही नाही. परंतु, आपल्या पक्षाचा विस्ताराचा भाग म्हणून नितीश कुमार आणि रामदास आठवले हे दोन्ही नेते भाजपच्या नेत्यांना पुढे आघाडीचा प्रस्ताव मांडत आहे.

Following Nitish Kumar, Athavale advised the BJP to take the lead in Uttar Pradesh and contest the elections

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण